मुंबई: मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी. पवई निमस्तरीय जलाशय येथील 22 किलोव्होल्ट उपकेंद्रात बिघाड झाला आहे. या कारणाने एल विभागातील काही परिसरात आज, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पाणीपुरवठा होणार नाही. तर, काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुरुस्ती काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 2 भरून पाणीपुरवठा टप्प्या–टप्प्याने सुरळीत करण्यात येणार आहे. उपरोक्त नमूद कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नक्की वाचा: आधी पटवली मग लग्न...', एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने सांगितला लव्हस्टोरीचा किस्सा!
कमी दाबाने पाणीपुरवठा होणारा परिसर
काजूपाडा, ख्रिश्चन गाव, मसरानी लेन, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, ब्राह्मणवाडी, पटेल वाडी, बुद्ध कॉलनी, एलआईजी- एमआईजी कॉलनी, विनोबा भावे नगर, प्रीमियर रेसिडेन्स, कपाडिया नगर,
पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणारा परिसर
न्यू मील मार्ग, मॅच फॅक्टरी लेन, तकिया परिसर, शिवाजी कुटीर, टॅक्सीमन वसाहत, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, ए. बी. एस. मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी, विजय नगर, जरी माता मंदिर परिसर
नक्की वाचा - Mumbai water crisis: टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, आता...