2 days ago

आज रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महामार्गावरुन संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आलं आहे. कशेजी ते खारपाडादरम्यान अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. 

Mar 16, 2025 21:55 (IST)

आंबे तोडले म्हणून मुलांना मारहाण

नांदेड शहराजवळच्या पुयनी येथे आंबे तोडल्याने एका निवासी शाळेतील वार्डनने तीन शाळकरी मुलांना जबर मारहाण केली.  या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुयनी गावाजवळ जिज्ञासा नावाची निवासी शाळा आहे.  या शाळेत गावातील मुलं देखील शिकायला आहेत. शाळेतील दोन मुलं आणि गावातील त्यांचा एक मित्र असे तिघे जण आज सायंकाळी शाळेच्या परिसरात आले.  झाडावरील आंबे तोडताना त्यांना वार्डन परमेश्वर संकेवाद याने पाहिले. या तिन्ही मुलाना त्याने प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केली.

Mar 16, 2025 19:50 (IST)

मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात शिमग्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. काही किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

Mar 16, 2025 16:37 (IST)

पाकिस्तानी सैन्याच्या बसवर आत्मघातकी हल्ला, 90 सैनिक ठाकर

पाकिस्तानी सैन्याच्या बसवर आत्मघातकी हमला करण्यात आला आहे. हा हल्ला बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे. या हल्लात 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावाही बलूच आर्मीने केला आहे. मात्र हा दावा पाकिस्तान प्रशासनानं फेटाळला आहे. काही दिवसा पूर्वी बलूच आर्मीने पाकिस्तानची ट्रेन हायजॅक केली होती. 

Mar 16, 2025 16:18 (IST)

पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जण ठार

पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात झाले आहेत. एकाच रात्री झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.   तर अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Advertisement
Mar 16, 2025 12:16 (IST)

Live Update : अहमदनगर-जामखेड रोडवरील चंदन प्लास्टिक कंपनीला आग

अहमदनगर-जामखेड रोडवरील चंदन प्लास्टिक कंपनीला आग...

सारोळा बद्दी गावालगत होती कंपनी...

आग विझवण्यासाठी अग्निशमन दल नगर शहर आणि एमआयडीसी मधून बोलवण्यात आले...

प्लास्टिक असल्याने काही वेळातच आगीने घेतले भीषण स्वरूप...

Mar 16, 2025 10:55 (IST)

Live Update : पुण्यात नाट्यगृह आरक्षण ऑनलाईन बुकिंग ॲप विरोधात आंदोलन..

पुण्यात नाट्यगृह आरक्षण ऑनलाईन बुकिंग ॲप विरोधात आंदोलन..

पुणे महानगरपालिकेकडून नवं ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. याच विरोधात नाट्य निर्माते तसेच नाट्य व्यवस्थापक, तंत्रज्ञ, रंगकर्मी विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने विरोध आंदोलन करण्यात येत आहे. 

पुणे महापालिकेच्यावतीने नुकतंच नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग तयार केलं आहे. रंगयात्रा ॲपला विरोध म्हणून हे आंदोलन कारण्यात येत आहे. जेष्ठ अभिनेते तसेच राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचा उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे  आंदोलन करण्यात आलं. 

Advertisement
Mar 16, 2025 09:42 (IST)

Live Update : पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार

पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार 

पावसाची नोंद अचूकपणे व्हावी आणि उपाययोजना करता याव्यात यासाठी पालिकेचा निर्णय 

शहरात पावसाळ्यात विविध ठिकाणी पावसाचे स्वरूप कमी जास्त होत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्याचे मापन याद्वारे करण्यात येणार आहे. 

महापालिका यासाठी हवामान विभागाची मदत घेणार आहे यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Mar 16, 2025 08:18 (IST)

Live Update : पीएमआरडीएकडून उद्यापासून पुन्हा बुलडोजर कारवाईला सुरुवात होणार

पीएमआरडीएकडून उद्यापासून पुन्हा बुलडोजर कारवाईला सुरुवात होणार 

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीकडून अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम 

17 ते 30 मार्च कालावधीत राबविण्यात येणार दुसऱ्या टप्प्यातील विशेष मोहीम 

तीन ते 13 मार्च पर्यंत ला कारवाईत अडीच हजार पेक्षा अधिक अतिक्रमणावर कारवाई

Advertisement
Mar 16, 2025 07:32 (IST)

Live Update : जळगावमध्ये नव तेजस्विनी महिला महोत्सवाला सुरुवात

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नव तेजस्विनी महिला महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले असून तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांच्या बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध महिलांच्या बचत गटांनी विविध खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू महिला बचत गटांनी सादर केल्या आहेत

Mar 16, 2025 07:31 (IST)

Live Update : चाळीसगावमध्ये शिक्षण संस्था चालकाकडून शिक्षकांचं आर्थिक शोषण

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकाकडून शिक्षकांचे आर्थिक शोषण करून शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या पगारावर संस्था चालकांनी डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला असून गेल्या 20-22 वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकारानंतर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या संस्थाचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अशोक खलाणे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षा संस्था चालकाचे नाव असून अशोक खलाने हे काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी या पदावर आहे. शाळेतील शिक्षकांना दमदाटी करत गेल्या 20 ते 22 वर्षात शिक्षकांच्या वेतनातून एक कोटींच्या जवळपास या संस्थाचालकांनी डल्ला मारला असून याप्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी त हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संस्थेचा संस्थाचालक व सचिव अशोक खलाणे यास अटक केली आहे.