Mumbai News: लोकलमध्ये मदतीचा बहाणा, 15 दिवसाच्या लेकराला सोडून आई फरार!

बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई: नवी मुंबई हार्बर रेल्वे मार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये प्रवास करत असताना एका अनोळखी महिला आपल्या अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला सोडून पसार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सीवूड्स रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी दोन महिलांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्कार दाखल केली आहे. 

Crime News: विनयभंग प्रकरणी 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

वाशी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 35 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेने दोन तरुणींना – दिव्या नायडू (19, रा. जुईनगर) आणि तिची मैत्रीण भूमिका माने (रा. चेंबूर) यांना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवले आणि स्वतः लोकलमधून न उतरता फरार झाली. दोघी तरुणी सानपाडा स्थानकातून लोकलमध्ये चढल्या होत्या आणि चेंबूरहून घरी परतत होत्या.

संबंधित महिलेनं त्यांना सांगितलं की, तिला सीवूड्स स्थानकावर उतरायचं असून, बाळ आणि सामान असल्यामुळे मदतीची गरज आहे. त्यानुसार, त्या दोघी महिलेला मदत करण्यासाठी स्वतः जुईनगर स्थानक सोडून सीवूड्स येथे उतरल्या. मात्र, सीवूड्स स्थानकावर उतरतानाच महिलेनं बाळ त्यांच्याकडे सोपवलं आणि आपली लोकलमधून उतरण्यास वेळ झाल्याचा बनाव करत तिथून पसार झाली. काही वेळ थांबूनही ती महिला परत न आल्याने, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बाळाची काळजी घेतली व नंतर वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Visa Expert Manpower : परदेशी नोकरी, डॉलरमध्ये कमाई, व्हिसाचं आमिष! फेमस YouTuber गजाआड

नवी मुंबई वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता (BNS) कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्यामुळे तपासात अडथळा येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

प्राथमिक माहितीवरून असे दिसते की, संबंधित महिला खानदेश परिसरात उतरली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बाळाच्या आईविषयी किंवा तिच्या ओळखीविषयी कोणाकडेही माहिती असल्यास, वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. "महिलेविरोधात कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बाळ सुरक्षित असून वैद्यकीय देखरेखीखाली आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही व अन्य तांत्रिक माध्यमांचा वापर सुरू आहे,"