जाहिरात

Visa Expert Manpower : परदेशी नोकरी, डॉलरमध्ये कमाई, व्हिसाचं आमिष! फेमस YouTuber गजाआड

Visa Expert Manpower : मुंबई क्राईम ब्रँचनं एका फेमस YouTuber ला अटक केलीय. त्याच्यावर देशभरातल्या बेरोजगार तरुणांना परदेशात आकर्षक नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Visa Expert Manpower : परदेशी नोकरी, डॉलरमध्ये कमाई, व्हिसाचं आमिष! फेमस YouTuber गजाआड
प्रतिकात्मक फोटो

पारस दामा, प्रतिनिधी

Visa Expert Manpower : परदेशात नोकरी मिळवून अधिक पैसा मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. याच स्वप्नांचा गैरफायदा करणारे अनेक महाभाग वेळोवेळी उघड झाले आहेत. मुंबई क्राईम ब्रँचनं एका फेमस YouTuber ला अटक केलीय. त्याच्यावर देशभरातल्या बेरोजगार तरुणांना परदेशात आकर्षक नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

संजय विश्वकर्मा (वय 33) असं या आरोपीचं नाव आहे. तो 'Visa Expert Manpower' नावाचे YouTube चॅनल चालवत होता. या चॅनलच्या माध्यमातून त्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील अनेक राज्यांतील तरुणांना जाळ्यात ओढलं होतं. संजय विरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला सध्या चारकोप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरु आहे. 

4.09 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, संजय विश्वकर्मा आणि त्याचा साथीदार अब्दुल्ला हुसेन आलम शेख यांनी मोहम्मद हसन गुलाम रसूल, त्यांचा मुलगा आसिफ आणि जावई मुनव्वर शेख यांना परदेशात नोकरी आणि व्हिसा मिळवून देण्याच्या बहाण्याने 4.09 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दखल करण्यात आली होती. यापूर्वी क्राईम ब्रांच युनिट-5 ने अब्दुल्लाला अटक केली होती, परंतु मुख्य आरोपी संजय फरार होता.

Nalasopara : 32 लाखांच्या बदल्यात घेतले 4 फ्लॅट, पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरचा टोकाचा निर्णय

( नक्की वाचा :  Nalasopara : 32 लाखांच्या बदल्यात घेतले 4 फ्लॅट, पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरचा टोकाचा निर्णय )

कशी झाली अटक?

पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या लोकेशनचा शोध घेऊन त्याला वसईच्या नयागाव परिसरातून अटक केली. संजय वारंवार मोबाईल नंबर आणि ओळख बदलून लोकांना दिशाभूल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय 'Visa Expert Manpower' हे YouTube चॅनल चालवत असे. त्याचे 6 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तो उमेदवारांच्या बनावट मुलाखती आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना परदेशात पाठवले जात असल्याचा विश्वास देत असे. त्यामुळे अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. 

अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल

संजय विरोधात भाईंदर येथील नवघर पोलीस ठाणे, राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाणे आणि हरियाणातील सदर पोलीस ठाण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने 15 पेक्षा जास्त तरुणांची फसवणूक केल्याचा क्राईम ब्रँचला संशय आहे. त्याच्या नेटवर्कमधील इतरांचीही पोलीस चौकशी करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com