मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, दरोडे, मारामाऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे, मुंबईमध्ये गावगुंडांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशातच काही मद्यधुंद तरुणांनी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदारालाच त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर..
(नक्की वाचा: विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या स्वीय सहाय्यकांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बीएमडब्ल्यू गाडीने उपाध्याय यांना धडक दिल्यानंतर ते गाडी थांबवून बोलण्यासाठी गेले असता मद्यधुंद तरुणांनी त्यांच्या अंगावर कुत्रा सुडला. स्वतः संजय उपाध्याय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे.
काय आहे संजय उपाध्याय यांची पोस्ट?
"गंभीर घटना - मद्यधुंद तरुणांची धक्कादायक कृती! काल दुपारी माझे स्वीयसहायक एका अपघातात जखमी झाले आहेत. बीएमडब्ल्यू गाडीने धडक दिल्यानंतर ते गाडी थांबवून बोलणीसाठी गेले असता, त्या गाडीतून दोन मद्यधुंद तरुणांनी त्यांच्यावर कुत्रा सोडला. परळ येथील Gleneagles Hospital येथे सध्या माझे सहकारी उपचार घेत आहेत', अशी माहिती संजय उपाध्याय यांनी दिली आहे.
(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)
तसेच आज मी स्वतः त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकाराची योग्य ती दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित नाही - तर रस्ते सुरक्षेच्या बाबतीत एक गंभीर इशारा आहे, असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.