मुंबई: शिवसेना ठाकरे गटाकडून आज शिवसंचार सेना या नव्या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. काळ हा झपाट्याने बदलतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान हा जिवनाचा अविभाज्य घटक बनत आहे. मात्र तंत्रज्ञानातून कोणाची फसवणूक होत असेल तर ती चुकीची आहे. यावर कोणीतरी लक्ष ठेवण्याची गरज आहे. यापुढे तसं होऊ नये यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही शिवसंचार सेना असणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी ूबोलताना भारतीय जनता पक्षाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. "आज भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोईप्रमाणे आहे. मित्रपक्षांनाच नव्हे माझ्या सर्वांनाच शुभेच्छा असतात. रामनवमी हा जर तुमच्या पक्षाचा स्थापनेचा दिवस असेल तर जसे राम वागले तसे वागा. समाजासाठी काम करा. एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा.." असं ते म्हणाले.
'निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू म्हणाले होते. कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे रामाचे नाव घेण्याची यांची लायकी नाही. आम्ही मराठीबद्दल चला मराठी शिकूया असा एक उपक्रम सुरु केला आहे. त्याचा लाभ या लोकांनी घ्यावा," असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेच्या मराठीवरील भूमिकेवरुनही निशाणा साधला.
नक्की वाचा - Amit Gorkhe News: 'खोटारडेपणाचा निषेध...', मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आमदार अमित गोरखेंचा संताप
"ऑर्गनायझरमध्ये छापून आले की, वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्यांची पुढची पायरी ही ख्रिश्चन समुदाय. बौध समुदायाकडे जेवढ्या जमिनी असतील त्या काढून घेतील. मग हिंदू देवस्थानच्या जमिनीवरही त्यांचा डोळा आहे. त्याला आम्ही विरोध केला आहे. आता सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत.एकीकडे धर्माधर्मात झुंजवायचे, लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावायचं अन् स्वतः जमिनी काढून घ्यायच्या.