
पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या पत्नी तनिषा भिसेंना आपला जीव गमवावा लागला. पैसे भरल्याशिवाय उपचार न करण्याची भूमिका घेतल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हे आरोप खोटे असून ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून ही तक्रार केल्याचा अहवाल आता मंगेशकर रुग्णालयाने दिला आहे. यावरुनच आता भाजप आमदार अमित गोरखे यांनी संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना 2023 सालीच रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही अवघड होते त्यामुळे या प्रकरणी रुग्णालयाची काहीही चूक नसून आधी पैसे मागितल्याच्या रागातून खोटी तक्रार केल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
मंगेशकर हॉस्पिटलने दिलेल्या या अहवालावर आता भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे-यांनी संताप व्यक्त केला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा खोटारडेपणाचा तीव्र निषेध! अतिशय चीड आणणारा आणि खोटेपणाने भरलेला अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. हे सर्व केवळ स्वतःच्या चुकीला लपवण्यासाठी करण्यात आलेले केविलवाणे प्रयत्न आहेत. या प्रकारामुळे निष्पाप रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अनावश्यक वेदना सहन कराव्या लागत आहेत. ही केवळ रुग्णालय प्रशासनाची चूक नाही, तर मानवतेवरचा घाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?)
तसेच दीनानाथ हॉस्पिटल, जे स्वतःला धर्मादाय रुग्णालय म्हणवते, प्रत्यक्षात फक्त श्रीमंतांचीच सेवा करणारं एक धंदेवाईक ठिकाण बनलं आहे. जर रुग्णालयाला पैसे नको होते, तर त्या गर्भवती महिलेचं उपचार करणं किंवा तिला रुग्णालयात भरती करणं का टाळलं? गरिबांच्या जीवनाला त्यांना काहीही महत्त्व नाही. फक्त पैसे दिलेल्या रुग्णांचीच काळजी घेतली जात आहे, आणि गरीबांना महत्त्व दिलं जात नाही, अशा शब्दात संतापही व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- Shirdi News : कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world