- विशाल पाटील, प्रतिनिधी
Kishori Pednekar: आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची (BMC) पहिली महासभा आज पार पडत आहे. या सभेमध्ये मुंबईच्या राजकारणातील एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळणार आहे. महापालिकेच्या इतिहासात गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान आहे. या माहितीनुसार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. यामुळे महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही महत्त्वाची पदे महिलांकडे गेल्याने महापालिकेत खऱ्या अर्थाने महिला राज दिसणार आहे.
25 वर्षांनंतर इतिहास बदलणार
मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते हे पद वर्ष 2000 पासून अस्तित्वात आले. तेव्हापासून आजपर्यंत या पदावर नेहमीच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. पण वर्ष 2026च्या या पहिल्या महासभेत किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यास हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला नगरसेविका ठरतील. आतापर्यंत हे पद प्रामुख्याने काँग्रेसकडे असायचे.
(नक्की वाचा: Malegaon News: फोटो पुन्हा लागणार, वादाचा भडका उडणार! उपमहापौर शान ए हिंद थेट बोलल्या...)
महापालिकेत 'महिला राज'चा उदय
मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाल्यानंतर, आता विरोधी पक्षनेते पदही एका अनुभवी महिला नेत्याकडे जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी यापूर्वी मुंबईचे महापौर पद भूषवले आहे. विशेषतः कोविड काळात त्यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यांच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा शिवसेनेला सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी होऊ शकतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूने महिलांचे नेतृत्व असल्याने मुंबईच्या प्रश्नांवर एक वेगळी आणि संवेदनशील चर्चा सभागृहात पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गणेश खणकर यांच्याकडे सभागृह नेतेपदाची धुराएकीकडे विरोधी बाकावर किशोरी पेडणेकर असतील, तर दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून निवड करण्यात येणार आहे. गणेश खणकर हे भाजपचे निष्ठावान नेते मानले जातात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world