निलेश वाघ, मालेगाव:
Tipu Sultan Photo Controversy Malegaon: मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टीपू सुलतानचा फोटो लावल्याने राज्यात मोठा वादंग पाहायला मिळाला. या फोटोला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला. मोठा राजकीय राडा झाल्यानंतर उपमहपौरांच्या दालनातून टीपू सुलतानचा फोटो हटवण्यात आला. मात्र आपल्या दालनात पुन्हा हा फोटो लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावणार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे की, कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो दालनात पुन्हा लावण्यात येईल..असे वक्तव्य शान ए हिंद यांनी एका स्वागत समारंभात केले..यामुळे पुन्हा एकदा मालेगावात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Pune Election: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! पुण्यातील पराभव जिव्हारी लागल्याने यापुढे...
मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित स्वागत कार्यक्रमात भाषण करताना डेप्युटी मेयर शान-ए-हिंद यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचे कौतुक केले. तसेच, त्यांचा फोटो लावणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी म्हटले. देशभरात टिपू सुलतान यांच्या संदर्भातील वाद आणि विविध विधानांमुळे निर्माण झालेला गदारोळ अद्याप शांत झालेला नसतानाच उपमहापौर यांचे हे दुसरे विधान समोर आले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
काय म्हणाल्या शान ए हिंद?
टिपू सुलतान यांनी हिंदू- मुस्लीम असा भेदभाव केला नाही. त्यांनी महिलांना संरक्षण दिले. त्यांनी हिंदूंचाही विचार केला, मुस्लिमांचाही विचार केला. मंदिरे सुरक्षित ठेवली, मश्चिदीही सुरक्षित ठेवल्या. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला जाईल, असं उपमहापौर शान ए हिंद यांनी म्हटलं आहे. आता त्यांच्या या विधानावरुन नव्याने वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world