जाहिरात

Mumbai-Pune Missing Link: मोठी Good News! मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट; मिसिंग लिंक 'या' दिवशी सुरु होणार?

सुमारे ६,७०० कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नसून सुरक्षेच्या बाबतीतही जागतिक दर्जाचा ठरणार आहे.

Mumbai-Pune Missing Link: मोठी Good News! मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट; मिसिंग लिंक 'या' दिवशी सुरु होणार?
AI Image

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Mumbai- Pune Missing Link:  मुंबई तसेच पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई- पुणे महामार्गावरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक सुरु होण्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. लवकरच हा मिसिंग लिंक वाहतुकीला खुला करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्याची तारीखही समोर झाली आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आणला असून, तांत्रिक चाचण्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. सुमारे ६,७०० कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नसून सुरक्षेच्या बाबतीतही जागतिक दर्जाचा ठरणार आहे.

Asha Bhosle: आशा भोसलेंच्या निधनानंतर पाकिस्तानात वाद! 'जिओ न्यूज' अडचणीत, काय आहे प्रकरण?

​घाटातील प्रवासाला 'बायपास'

खोपोली ते लोणावळा दरम्यानचा १९ किलोमीटरचा अवघड घाटमार्ग या १३.३ किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गामुळे बायपास होणार आहे. या मार्गात आशियातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्यांचा समावेश असून, यामुळे प्रवाशांचा सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे बसवलेली एआय-आधारित (Artificial Intelligence) स्वयंचलित सुरक्षा प्रणाली.

बोगद्यामध्ये आग, धूर किंवा विषारी वायूंचे रिअल-टाइम मॉनिटरिंग केले जाणार आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 'लिनिअर हीट-डिटेक्शन' केबलच्या माध्यमातून सेन्सर अवघ्या काही सेकंदांत सक्रिय होतील. त्यानंतर 'वॉटर-मिस्ट फायर सप्रेशन सिस्टम'द्वारे दर ४ मीटरवर असलेल्या नोजल्समधून प्रतिमिनिट ३६.५ लिटर पाण्याची फवारणी सुरू होऊन आगीवर नियंत्रण मिळवले जाईल.

(नक्की वाचा-  VIDEO: स्वयंचलित दरवाजे, मोठ्या खिडक्या अन् बरंच काही; अ‍ॅडव्हान्स लोकल ट्रेन मुंबईत दाखल, पण...)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com