जाहिरात

Mumbai Pune Expressway: 'मुंबई-पुणे एक्सप्रेसवे' वर पोलिसांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुरू करण्यात आलेल्या इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) या स्वयंचलित प्रणालीमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना थेट चलान जारी केले जातात.

Mumbai Pune Expressway: 'मुंबई-पुणे एक्सप्रेसवे' वर पोलिसांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई
पुणे:

Mumbai Pune Expressway News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 36 लाख वाहनचालकांवर इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) मार्फत कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर एकूण 600 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामहामार्गावरील वाहतूक शिस्तीच्या अंमलबजावणीसाठी आरटीओने नवी यंत्रणा आणली होती. राज्य परिवहन विभागाने जुलै 2024 पासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ITMS प्रणालीचा वापर सुरू केला होता. 

नक्की वाचा: लोक अदालतीमध्ये ई-चलानची तडजोड होणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

नियम मोडताक्षणी चलान जारी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुरू करण्यात आलेल्या इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) या स्वयंचलित प्रणालीमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना थेट चलान जारी केले जातात. RTO अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नियमांचे सर्वाधिक उल्लंघन ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगसंदर्भातील आहे. ओव्हर स्पीडिंगच्या प्रकरणांमध्ये चलान त्वरित जारी होते, तर इतर नियमांच्या उल्लंघनाबद्दल शहानिशा करून दंड निश्चित केला जातो.

नक्की वाचा: मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास थेट निलंबन, वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला जरब बसवण्यासाठी कडक निर्णय

अपघातांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास

आतापर्यंत जारी केलेल्या 36 लाख चलनांपैकी 5 लाख 38 हजार चलान निकाली काढण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर आकारण्यात आलेल्या 600 कोटी रुपयांच्या दंडापैकी 90 कोटी रुपयांची रक्कम आतापर्यंत वसूल झाले आहेत. ITMS प्रणालीमुळे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर जलद आणि पारदर्शक कारवाई करणे शक्य झाले असल्याचे आरटीओचे म्हणणे आहे. या प्रणालीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असाही दावा केला जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ही प्रणाली प्रभावी असल्याचे आरटीओचे म्हणणे आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com