जाहिरात

प्रवाशांनो! हायवेवर Truck Lay-By बोर्ड का लावतात? काय आहे त्याचा नेमका अर्थ? 'ते' अपघात टळू शकतात

हायवेवर लावलेला हिरव्या रंगाचा Truck Lay-By बोर्ड पाहून तुमचाही गोंधळ उडतो? इंटरनेटवर एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याने दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रवाशांनो! हायवेवर Truck Lay-By बोर्ड का लावतात? काय आहे त्याचा नेमका अर्थ? 'ते' अपघात टळू शकतात
Truck Lay By Traffic Sign Board Meaning

Traffic Rules : हायवेवर लावलेला हिरव्या रंगाचा Truck Lay-By बोर्ड पाहून तुमचाही गोंधळ उडतो? इंटरनेटवर एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याने दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या बोर्डावर कोणत्या प्रकारचं चिन्ह आहे आणि हे का बनवलं जातं? मोटार व्हेईकल नियमांनुसार याचा नेमका अर्थ काय आहे, हे जाणून घेऊयात. 

हायवेवर किंवा एक्स्प्रेसवेवर प्रवास करताना तुम्ही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे अनेक बोर्ड पाहिले असतील. नुकतीच सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी हिरव्या रंगाच्या बोर्डवर Truck Lay-By (ट्रक ले-बाय)संबंधीत दोन सवाल उपस्थित केले आहेत. 

ट्रक ले-बाय कशासाठी बनवले जातात?

जर तुम्हीही नेहमी हायवेवर ड्राईव्ह करता,वाहतूक नियमांसंबधीत या दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहित असायला हवीत. या प्रश्नांच्या उत्तराबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..

हे कशाप्रकारचं चिन्ह आहे?

फोटोत पाहू शकता की हिरव्या रंगाचा आयताकार बोर्ड, सूचनात्मक रोड चिन्हाच्या कॅटेगरीत येतं. अशाप्रकारचे निळे किंवा हिरव्या रंगाचे बोर्ड चालकांना कोणतेही आदेश देत नाहीत. तर त्यांना दिशा, अंतर किंवा पुढे मिळणाऱ्या सुविधा जसं की (पेट्रोल पंप,रुग्णालय, भोजनालय किंवा पार्किंग) आदीची माहिती देतं. 

नक्की वाचा >> Satara News: साताऱ्याची सकाळ धडकी भरवणारी, स्थानिकांसह पर्यटकांमध्ये थरथराट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

'ट्रक ले बाय' कोणासाठी बनलं आहे?

'ले बाय'हायवेच्या किनाऱ्याजवळ बनलेलं एक अतिरिक्त आणि रुंद लेन किंवा पक्की जागा असते, जी मेन रोड (कॅरिजवे)पेक्षा थोडी चांगली असते. ट्रक ले बाय विशेषत: अवजड वाहन (ट्रक) सुरक्षित थांब्यासाठी बनवले जातात. 

चालकाला आराम करण्यासाठी : दूरचं अंतर गाठणाऱ्या ट्रक चालकांना सतत ड्रायव्हिंग केल्यानं थकवा किंवा झोप येऊ शकते. ले बाय त्यांना सुरक्षित जागेवर ट्रक थांबवून आराम करण्याची सुविधा देतं.यामुळे झोपेत होणारे अपघात टळू शकतात. 

नक्की वाचा >> Video : फॉरेनर महिलेसमोर देशाचं नाक कापलं..सेल्फीसाठी केलं नको ते कृत्य, मुंबईचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल

वाहनाचा तपास किंवा एमरजन्सी : जर ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड असेल, टायर चेक करणं किंवा आणखी कोणती एमरजन्सी असेल,तर ड्रायव्ह त्यांच्या गाडीला मेन रोडवरून हटवून ले बाय मध्ये सुरक्षित उभी करू शकतात.

अपघातापासून सुरक्षा : सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की, हायवेवर गाड्या खूप वेगाने धावत असतात. जर एखादा ट्रक ले-बाय शिवाय रस्त्याच्या कडेला उभं केलं असेल,तर पाठीमागून येणाऱ्या वेगवान गाड्या त्या वाहनाला टक्कर देऊ शकतात. ले-बायमुळे अशाप्रकारचे धोके टळू शकतात. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com