जाहिरात

Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मेगाब्लॉक! आज 2 तास वाहतूक बंद; प्रवासाआधी 'हे' वाचा

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या कालावधीत जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मेगाब्लॉक! आज 2 तास वाहतूक बंद; प्रवासाआधी 'हे' वाचा

Mumbai Pune Expressway Megablock: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवर बोरघाट मार्गावर दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. बोरघाट मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.

Ahilyanagar News: "दिवस उजाडायच्या आत...." राष्ट्रवादीच्या आमदाराचं चिथावणीखोर वक्तव्य, जाहीर सभेत आवाहन

मुंबई- पुणे एक्सप्रेवर मेगाब्लॉक

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधात्मक कामासाठी आज दुपारी १२ ते २ या वेळेत विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या काळात बोगद्याच्या वरच्या भागात लावलेल्या संरक्षण जाळ्यांमध्ये अडकलेले दगड आणि दरडींचे अवशेष काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या कालावधीत जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

​या नियोजित कामामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व जड वाहनांना ५९.००० कि.मी. पासून, तर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना ३०.००० कि.मी. पासून पुढे जाण्यास बंदी असेल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हलकी वाहने आणि प्रवासी बसेससाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी हलकी वाहने ३९.००० कि.मी. आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने ५९.००० कि.मी. वरील कनेक्टर लिंकिंग मार्गाचा वापर करू शकतील.

​लोणावळा आणि खंडाळा परिसरातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ४५.००० कि.मी. वर थांबविण्यात येईल. सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा असून, संबंधित वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. हे काम तातडीचे असल्याने दुपारी १२ ते २ या वेळेत द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांनी पर्यायी मार्गाचा किंवा वेळेचे नियोजन करूनच प्रवासाला सुरुवात करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोंडी किंवा गैरसोय होणार नाही.

FDA Action: तुकाराम मुंडेंचा दणका! पुणे विद्यापीठातील मेसचा परवाना रद्द, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरु होता खेळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com