जाहिरात

Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद; 2 दिवस प्रवासाचं नियोजन करा!

2 दिवस मुंबई-पुणे मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद; 2 दिवस प्रवासाचं नियोजन करा!

Mumbai News : पुणे ते मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव / कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणं आणि रंगकाम करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 2 दिवस मुंबई-पुणे मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यानुसार, मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ही  सर्व वाहने किवळे – देहूरोड – तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.

नक्की वाचा - Weather Alert : 4 दिवस धोक्याचे! यात्रा, धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करा; हवामान विभागाकडून अलर्ट


वाहनचालकांनी प्रवासाचं योग्य नियोजन करावं...

पुण्याकडे येणारी वाहतूक शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com