Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर नियमितपणे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोल महागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील. 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. जे मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या हद्दीतील असतील त्या मार्गांसाठी ही टोल वाढ लागू असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनांसाठी सिंगल टोलमध्ये 5 रुपयांची तर रिटर्न टोलमध्ये 10 रुपयांची वाढ होणार आहे. तर इतर वाहनांच्या सिंगल टोलमध्ये 15 रुपयांनी आणि रिटर्न टोलमध्ये 20 रुपयांनी वाढ होणार आहे. याशिवाय फास्टटॅग नसलेल्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
बातमी अपडेट होत आहे.