जाहिरात

Mumbai News: पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! कलिंगडामुळे जीव गेला नाही.. हादरवणारे कारण समोर

गेल्या आठवडाभरापासून याबाबतचा अधिक तपास सुरु होता. अखेर या तपासाला यश आले असून एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे सत्य आता समोर आले आहे. 

Mumbai News: पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! कलिंगडामुळे जीव गेला नाही..  हादरवणारे कारण समोर

Mumbai Pydhonie Death: मुंबईतील पायधुनी येथे कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आधी बिर्याणी नंतर कलिंगड खाऊन झोपी गेले अन् चौघांचाही मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. या धक्कादायक प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात कलिंगड खाऊन जीव गेल्याचा दावा करण्यात आल्याने भितीचे वातावरण पसरले होते. गेल्या आठवडाभरापासून याबाबतचा अधिक तपास सुरु होता. अखेर या तपासाला यश आले असून एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे सत्य आता समोर आले आहे. 

Pune Crime: चिंताजनक! दोन दिवसात 6 अल्पवयीन मुली बेपत्ता; पुण्यात काय घडतंय?

आधी उंदिर मारण्याचे औषध मग कलिंगड.. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या  पायधूनी येथील चार जणांच्या मृत्यू प्रकारणात मोठी अपडेट समोर आली आहे. मृत डोकाडिया परिवाराने आधी उंदीर मारण्याचं औषध खाल्लं, त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचे समोर समोर आले आहे. जे जे हॉस्पिटलच्या वरिष्ठ सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. उंदीर मारण्याच्या औषधाची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्ले असल्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

दातात अडकलेलं औषधं कलिंगडाच्या कापांना देखील लागले होते. मात्र आता याप्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून हे औषध बाजारात सहज मिळणारे रॅट पोयसन होतं की लाबोरेटरीमध्ये मिळणारं 100 टक्के कन्सेन्ट्रॅटेड झिंक फोस्फेट हा सवाल उपस्थित होत आहे. 

दरम्यान, २६ एप्रिल रोजी ही भयंकर घटना घडली होती. पायधुनी परिसरात अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६)  आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ल होते त्यामुळे कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता  वर्तवली जात होती. फॉरेन्सिक तपासामध्ये मृतकांच्या शरीरात आणि कलिंगडात सापडलं उंदीर मारण्याचं औषध आढळून आले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले होते. 

Nida Khan: कुठे लपलेली TCS प्रकरणाची मास्टरमाइंड? निदा खान 'अशी' अडकली जाळ्यात; 27 दिवस गुंगारा अन्...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com