जाहिरात

Mumbai News : कलिंगडावरील चाट मसाल्याने घात केला? 'ती' पावडर पोटात कशी गेली? पायधुनी प्रकरणाचं गूढ उलगडेना!

मुंबईतील पायधुनी भागातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

Mumbai News : कलिंगडावरील चाट मसाल्याने घात केला? 'ती' पावडर पोटात कशी गेली? पायधुनी प्रकरणाचं गूढ उलगडेना!
प्रतिकात्मक फोटो

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईतील पायधुनी भागातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधातील झिंक फॉस्फाइड आढळून आलं आहे. मात्र हे झिंक फॉस्फाइड पोटात कसं गेलं याची माहिती कळू शकलेली नाही. त्यामुळे चौघांच्या मृत्यूचं गूढ अद्याप सुटलेलं नाही. 

झिंक फॉस्फाइट पोटात कसं गेलं?   

पायधुनीतील डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात झिंक फॉस्फाईड पोटात कसं गेलं याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. FDA आणि फॉरेन्सिकचे अहवाल आल्यानंतर ही पोलिसांसमोर झिंक फॉस्फाईड आलं कसं याबाबत प्रश्नचिन्ह आहे. झिंक फॉस्फाईडचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांची कसून तपास मोहीम सुरू आहे. घरातील आणखी काही वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता मीठ आणि चाट मसाल्याची देखील तपासणीसाठी फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलं आहे. अनेकजण कलिंगडावर मीठ किंवा चाट मसाला टाकून खात असल्याने त्या अनुषंगानेही तपास केला जात आहे. झिंक फॉस्फाईड पोटात कसं केलं याचाही शोध घेतला जात आहे. 

नक्की वाचा - महाराष्ट्रात मद्यप्रेमींचा ट्रेंड बदलला; विदेशी दारूला सारलं दूर; 'या' पेयाचा वर्षभरात 46 कोटी लिटर खप

२६ तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्लं होतं त्यामुळे कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. २६ तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता. अद्यापही या प्रकरणात मृत्यूचं कारण कळू शकलेलं नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com