Mumbai Rain Alert: कृपया लक्ष द्या! मुंबई, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा मोठा इशारा

मुंबई आणि रायगडमधल्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल. तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Rain Alert:  गेल्या दोन आठवड्यांपासून रखडलेला मान्सून आता मुंबईसह राज्यभर सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. आज मुंबईत मान्सूनची दमदार एन्ट्री होणार असून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. तसेच शहरात अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता हवामान विभागाने मुंबई तसेच रायगडसाठी सर्वात मोठा इशारा दिला आहे. 

Monsoon Update: मुंबईकरांनो छत्री-रेनकोट तयार ठेवा, अखेर मान्सून धडकणार! हवामान विभागाची मोठी अपडेट

मुंबईकरांसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा मोठा इशारा 

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांनो पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुंबई आणि रायगडमधल्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल. तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघताना छत्री घेऊनच बाहेर निघा. तसंच घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Advertisement

आज सकाळपासून मुंबईतील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील  नरिमन पॉईंट, बीकेसी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मान्सून पावसाची हजेरीने मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, हवामान बदलाच्या या स्थितीमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रायगडमध्ये पावसाची जोरदार हजेरी

दुसरीकडे,  रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. अलिबाग खोपोली, खालापूर  परिसरात काल संध्याकाळी उशिरा आठ वाजल्या पासून वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी सतत 12 तास आज सकाळ पडत असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. तर जिल्ह्यातील दक्षिण भागातील माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर तालुक्यात पावसाची पावसाच्या हलक्या सरी आज सकाळ पासून सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai News: मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! दादर स्टेशनवरील संतापजनक VIDEO; सकाळचा नाश्ता करताना सावधान