Maharashtra Monsooon Rain: मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या सुमारे दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा गती घेतली असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या सीमेवरून तो मुंबईत दाखल झाला आहे. एल निनोचा प्रभाव, कोरडी हवा आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव यामुळे मान्सूनच्या वाटचालीत आलेले अडथळे आता दूर झाले असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Shocking News: लग्न ठरलं, मांडव सजला! अक्षता पडण्याच्या 48 तास आधीच नवरीसह संपूर्ण कुटुंब संपलं
मान्सून मुंबईत दाखल होणार...
अखेर आज मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने आगेकूच केली आहे. सोमवारी मान्सून रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये धडकला. आणि आज तो मुंबईत दाखल होईल. दुसरीकडे सातारा आणि सोलापूर ओलांडून मान्सूनने पुणे जिल्ह्यातल्या मावळ, मुळशी आणि पुणे शहराचा भाग व्यापला. तर अहिल्यानगरमध्ये कर्जत, जामखेड, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेडचाही भाग मान्सूनने व्यापलाय. मान्सूनने प्रगती केल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल आहे. मान्सूनने यापूर्वीच कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला होता. आता पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाची सक्रियता वाढली आहे.
मान्सूनच्या या प्रगतीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत राज्याच्या उत्तर किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. दीर्घकाळ रेंगाळलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world