Mumbai Rain: आला रे आला...! मुंबईत पावसाला सुरुवात, आकाशात काळ्या ढगांची गर्दी; मान्सूनबाबत मोठी अपडेट

आज पहाटेपासूनही आकाशात काळे ढग दाटले असून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Rain News Monsoon Update: उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून शहरात वरुणराजाची दमदार एन्ट्री झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. त्याचबरोबर आज पहाटेपासूनही आकाशात काळे ढग दाटले असून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

Best Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! हंगामी पगारवाढ, ग्रॅच्युइटीबाबत मोठी घोषणा, किती रुपये मिळणार?

मुंबईत पावसाची हजेरी 

मुंबईत आज सकाळपासून ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे गरमीने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून मुंबई ठाणे, रायगड आणि उपनगरा मध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यासोबतच बीकेसी, घाटकोपर, चेंबुर, मानखुर्द, वरळी, लोअर परेल या भागातही पावसाने हजेरी लावली आहे. 

Advertisement

​भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, मान्सून २३ जूनपर्यंत मुंबईत पूर्णपणे सक्रिय होईल. सध्या रिमझिम पाऊस पडत असला, तरी हवामान खात्याने पुढील काही दिवस ‘यलो अलर्ट' दिला आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढणार असून, कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

दुसरीकडे, राज्यभरात मात्र अद्याप पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आता हा मान्सून तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कधी बरसतो आणि तलाव कधी भरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाने मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Rain Update : पुढील 2 दिवस मुंबई-ठाण्यात कसं असेल वातावरण; छत्रीची गरज लागणार की नाही?