Mumbai Rain: मुंबईकरांनो लक्ष द्या! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, समुद्रही खवळणार; BMCचं मोठं आवाहन

'नाऊकास्ट'नुसार, पुढील तीन तासांत या परिसरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Rain Alert:  ​मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने (IMD) आज, 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. दुपारी ११:३० वाजता जारी करण्यात आलेल्या या 'नाऊकास्ट'नुसार, पुढील तीन तासांत या परिसरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Mumbai Rain LIVE Blog: शिवाजी पार्कमध्ये महाकाय झाड कोसळलं, वाहतूक ठप्प; वाचा LIVE अपडेट्स

मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

  • मुंबई शहर आणि उपनगरीय भागांमध्ये सततच्या पावसामुळे व्यत्यय येत असला तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा जमिनीवर पूर्णपणे तैनात असून नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे.
  •  रेल्वे, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सामान्यपणे सुरू असून, मुंबईतील दैनंदिन जीवन कोणत्याही मोठ्या व्यत्ययाशिवाय सुरू आहे.
  • भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, ५ जुलै २०२६ रोजी, अतिवृष्टीचा इशारा देत बृहन्मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
  • दिवसभरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
  • अधूनमधून ताशी ५५-६५ किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे. नागरिकांना झाडांखाली आश्रय न घेण्याचा आणि त्यांच्याखाली वाहने उभी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • आज दुपारी ३:२२ वाजता ४.१९ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे.
  • सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता, नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सर्व सूचना आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, नागरिकांनी मदतीसाठी तात्काळ बीएमसीच्या १९१६ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधावा.