गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. याशिवाय कोकणातील काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आजही मुंबईसह उपनगर आणि कोकणाता मुसळधार पाऊस बसरणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 16 जून रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेडअलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुण्यातील घाट परिसरातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासाठी हा आठवडा चांगला ठरणार असल्याची शक्यता आहे. हा आठवडाभर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरला आहे. ही प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यभरात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - Mumbai News : खड्ड्यांच्या तक्रारी अॅप आणि व्हॉट्सअॅपवर करता येणार; BMC चं स्मार्ट पाऊल
मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस...
पहाटेपासुन मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई उपनगर सुद्धा जोरदार पाऊस असून परिणामी मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आज मुंबईत दिवसभर असाच पाऊस असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ३ः२३ वाजता समुद्राला मोठी भरती असून ४.३१ पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.