जाहिरात

Taxi Driver Experience:  कॉल आला अन् टॅक्सी ड्रायव्हरला घाम फुटला, हात थरथरले! मुंबईतील हृदयस्पर्शी प्रसंग

Mumbai Taxi Driver Struggle Heartbreaking Experience: एका टॅक्सीवाल्याचा हृदयस्पर्शी प्रसंग एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यावर नेटकऱ्यांनीही भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत

Taxi Driver Experience:  कॉल आला अन् टॅक्सी ड्रायव्हरला घाम फुटला, हात थरथरले! मुंबईतील हृदयस्पर्शी प्रसंग

Mumbai Taxi Driver Heartbreaking Experience: स्वप्नांचे शहर मुंबईत प्रत्येकाचा जगण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी संघर्ष सुरु असतो. कुटुंब, घर सोडून आलेले अनेकजण मुंबईत राबत असतात. एकीकडे घरची ओढ, दुसरीकडे जबाबदारीचे ओझ असा संघर्ष ते करत असतात. मुंबईतील अशाच एका टॅक्सीवाल्याचा हृदयस्पर्शी प्रसंग एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यावर नेटकऱ्यांनीही भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

प्रवाशाने सांगितला प्रसंग...

मेहुल आर. ठक्कर या व्यक्तीने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत एका टॅक्सी प्रवासादरम्यान घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्याने सांगितले की, सोमवारी ते दादर (Dadar) येथे एका काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवास करत होते. त्याच वेळी टॅक्सी चालकाला त्याच्या गावातून एक फोन आला. कॉल उचलताच त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता दिसू लागली. त्याचे हात थरथरत होते आणि आवाज तुटत होता.

VIDEO: गळ्यात OR कोड अन् भरमंडपात फेरी, लेकीच्या लग्नात पित्याने असं काही केलं.. वऱ्हाडीही गडबडले!

 त्याला फोनवर कळवण्यात आले की, त्याच्या मुलीचा अपघात  झाला आहे.  मी त्याला लगेच टॅक्सी थांबवायला सांगितली. त्याचे हात थरथरत होते आणि आवाजही फुटत नव्हता. त्याने घाईघाईत आपल्या पत्नीला फोन करून तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. काही वेळाने ड्रायव्हरने पुन्हा फोन केला, तेव्हा त्याला कळाले की, मुलीला गंभीर दुखापत ( झाली नाही, फक्त हातात फ्रॅक्चर (Fracture) असण्याची शक्यता आहे. हे ऐकून तो थोडा शांत झाला. 

मेहुलने त्याला श्वास घेण्याचा आणि स्वतःला सावरण्याचा सल्ला दिला. यावेळी ड्रायव्हरने जे काही सांगितले, ते मन हेलावणारे होते. तो म्हणाला, "मला घरी जायला हवे, कारण कुटुंबाला माझी गरज आहे. पण जर मी गेलो, तर पुढील दहा दिवस काहीही कमवू शकणार नाही... आणि घरी पैशांचीही (Money) गरज लागेल. ड्रायव्हरच्या या शब्दांनी मेहुल ठक्करलाही भरुन आले. 

प्रत्येकाचा संघर्ष वेगळा...नेटकरीही भावुक

मेहुलने लिहले की,  आपण अनेकदा 'वर्क-लाईफ बॅलन्स, सुट्ट्या,  रिमोट वर्क (Remote Work) आणि मेंटल हेल्थ डे, बद्दल बोलतो, पण जगात असेही लोक आहेत, ज्यांच्या जीवनात या सुविधा उपलब्ध नसतात. प्रत्येकाचे आयुष्य खरोखरच वेगळे असते. मेहुल यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक युजर्सनी कमेंट्स करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ही घटना केवळ एक टॅक्सी चालकाच्या नसून, त्या भारताची झलक आहे, जिथे लाखो लोक रोज आपल्या अडचणी असूनही इतरांच्या सुविधेसाठी काम करतात. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक संघर्ष दडलेला असतो, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

Buldhana News: मद्यधुंद महिलेचा भर रस्त्यात राडा! रस्त्यावरच झोपली, गाड्यांच्या रांगा, पुढे जे घडलं ते...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com