Mumbai Watermelon Death Case Update: मुंबईच्या पायधूनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डोकाडिया कुटुंबियांच्या या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून आधी बिर्याणी नंतर कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अंतिम अहवाल येणे अद्याप बाकी आहे, त्याआधी आलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून चक्रावणारा खुलासा झाला आहे.
Palghar Accident: अनर्थ टळला! भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात, डंपरची धडक; चालक जखमी
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
याबाबत सविस्तप माहिती अशी की, मुंबईतल्या पायधुनी परिसरातल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्वि्स्ट आला आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने फूड पॉयझनिंग'चा संशय व्यक्त केला जात होता. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नवा खुलासा झाला आहे. मृतांच्या अवयवांची भयंकर अवस्था झाली होती.
मृतांचे मेंदू, हृदय आणि आतडी चक्क हिरवी पडली होती. सामान्य विषबाधेत शरीरात असा बदल सहसा दिसत नाही. चारही मृतांच्या शरीरात एक धक्कादायक घटक सापडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात 'मॉर्फिन' या शक्तिशाली वेदनाशामक औषधाचे अंश सापडले आहेत. मॉर्फिनचा शोध लागल्याने हा फक्त अपघात आहे की घातपात? याचा संशय बळावला आहे.
मॉर्फिन म्हणजे काय?
मॉर्फिन हे अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे ज्याचा तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापर केला जातो. मॉर्फिन अफूच्या झाडाच्या बियांपासून किंवा लेटेक्सपासून तयार केलं जाते. वेदनाशामक औषधं अपयशी ठरल्यास डॉक्टर्सकडून मॉर्फीनचा सल्ला दिला जातो. मॉर्फिनथेट मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते. मेंदू आणि मज्जासंस्थेला वेदनेचे संकेत मिळण्यापासून थांबवते. यामुळेच मॉर्फीनचा गैरवापर रोखण्यासाठी कडक नियमही करण्यात आले आहेत.
Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी धावणार; 12 स्थानकांचा समावेश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world