जाहिरात

Mumbai Watermelon Case : कुटुंबातील 4 सदस्यांच्या मृत्यूनंतर Morphine चर्चेत; काय आहे हा जीवघेणा पदार्थ?

Mumbai Watermelon Death Case: सुरुवातील फूड पॉइजनिंगचं प्रकरण असल्याचं मानलं जात होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमुळे प्रकरणाने वेगळच वळण घेतलं.

Mumbai Watermelon Case : कुटुंबातील 4 सदस्यांच्या मृत्यूनंतर Morphine चर्चेत; काय आहे हा जीवघेणा पदार्थ?
मॉर्फिन काय आहे? ( Image Credit-AI)

Mumbai Watermelon Death Case: मुंबईतील पायधुनी भागातील एका घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. एका हसऱ्या-खेळत्या कुटुंबातील चार जणांचा अचानक मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम रिपोर्ट्स समोर आला, ज्यामुळे सारेजण हैराण झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

पायधुनीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबासोबत भयंकर घडलं. ४० वर्षीय पती, ३५ वर्षीय पत्नी आणि त्यांच्या दोन मुली आपल्या नातेवाईकांसोबत रात्री एकत्र बसून बिर्याणी खाल्ली. कुटुंबातील सात जण एकत्र जेवले. जेवण झाल्यानंतर पाहुणे आपल्या घरी निघून गेले. रात्रीच्या वेळी साधारण १ ते १.३० च्या दरम्यान कुटुंबातील चारही सदस्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाल्लं. तोपर्यंत सर्व ठीक होते. मात्र सकाळ होता होता परिस्थिती बिघडली. दुसऱ्या दिवसापर्यंत चारही जणांचा मृत्यू झाला.

फॉरेन्सिक रिपोर्ट शरीरातील अवयव हिरवे पडले...

सुरुवातील फूड पॉइजनिंगचं प्रकरण असल्याचं मानलं जात होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमुळे प्रकरणाने वेगळच वळण घेतलं. सूत्रांनुसार, जेव्हा मृतांच्या शरीराचा तपास झाला, तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. मृतांचे अंतर्गत अवयव उदा, मेंदू, हृदय आणि आतड्यांचा रंग हिरवा झाला होता. सर्वसाधारणपणे शरीरातील अवयवांचा रंग बदलण्यामागील कारण विषामुळे होत असल्याचं दिसतं.

एफडीएकडून तपास...

या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट FDA म्हणजे फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर झाला. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील वेगवेगळ्या ११ पदार्थांचे नमुने घेतले. यामध्ये रात्रीची बिर्याणी, कलिंगडाचे तुकडे, फ्रिजमधील पाणी, तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश होता. हैराण करणारी बाब म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये कोणतंही विषारी द्रव्य आढळून आलं नाही.

पोस्टमार्टम रिपोर्ट आणि मॉर्फिनचं रहस्य...

पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. रिपोर्टमध्ये मृतांच्या शरीरात मॉर्फिन (Morphine) च्या खुणा आढळून आल्या आहेत. मॉर्फिन एक शक्तिशाली पेन किलर आहे, ज्याचा उपयोग डॉक्टर गंभीर वेदना कमी करण्यासाठी करतात. मात्र याचा अतिरेकी वापर जीवघेणा असू शकतो. मॉर्फिन काय आहे आणि हे कसं काम करतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही डॉ. सुनील राणा ( एशियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, Associate Director & Head- Internal Medicine) यांच्याशी बातचीत केली.

मॉर्फिन काय असतं आणि ते कसं काम करतं?

डॉ. सुनील राणा यांनी सांगितलं की, मॉर्फिन एक अत्यंत शक्तिशाली ओपियोइड वेदनाशामक औषध आहे. ज्याचा उपयोग गंभीर तीव्र किंवा दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वेदना उदा. कॅन्सर सर्जरी किंवा हृदयविकाराच्या झटक्यापासून आराम मिळविण्यासाठी केला जातो. जेव्हा इतर सामान्य औषधे अयशस्वी ठरतात, तेव्हा हे औषध मेंदूकडे जाणारे वेदनांचे संकेत रोखण्यासाठी केंद्रीय मज्जासंस्थेवर (CNS) कार्य करते.

मॉर्फिन कसं काम करतं?

मोर्फिन शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या एंडोर्फिनची नक्कल करतं. म्हणजेच मॉर्फिन हे मेंदू आणि मणक्यातील म्यू ओपिओइड रिसेप्टर्सशी जोडण्याचं काम करतात, ज्यामुळे वेदनांचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, मोर्फिन केवळ वेदना कमी करत नाही, तर वेदनेबद्दलच्या व्यक्तीच्या भावनिक प्रतिसादातही बदल घडवतात ज्यामुळे त्यांना वेदना जाणवत नाहीत. या औषधाबाबत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. हे गोळ्या, द्रव्य इंजेक्शनद्वारे किंवा तोंडाने दिले जाते. याच्या दीर्घकाळ वापरामुळे शारीरिक अवलंबित्व, व्यसन आणि सहनशक्ती वाढू शकते. त्यामुळे, हे केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच दिले जाते. याच्या अतिवापरामुळे मळमळ, बद्धकोष्ठता, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखे दुष्परिणाम देखील होतात.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com