जाहिरात

Mumbai IMD Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 तास धोक्याचे; हवामान विभागाचा मोठा इशारा

या इशाऱ्यानुसार, पुढील तीन तासांच्या कालावधीत मुंबईत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mumbai IMD Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 तास धोक्याचे; हवामान विभागाचा मोठा इशारा

Mumbai Rain IMD Alert: गरमीने त्रस्त मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, रायगड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच हवामान विभागाकडून मुंबईत पुढील 3 तासांसाठी विजांच्या कडकडटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे. 

Mumbai Rain: आला रे आला...! मुंबईत पावसाला सुरुवात, आकाशात काळ्या ढगांची गर्दी; मान्सूनबाबत मोठी अपडेट

मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 तास धोक्याचे

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज सकाळी मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. २२ जून रोजी सकाळी ७ वाजता देण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार, पुढील तीन तासांच्या कालावधीत मुंबईत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. या दरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर इतका असण्याची शक्यता आहे. अचानक निर्माण होणाऱ्या या हवामान बदलामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः समुद्रकिनारपट्टीवरील भागात आणि सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

​हे हवामान खात्याचे तातडीचे अपडेट असून, पावसाचा जोर लक्षात घेता महापालिकेनेही आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विजा चमकत असताना झाडांखाली किंवा कच्च्या घरांजवळ उभे राहणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील वाहतुकीवरही या पावसामुळे परिणाम होण्याची शक्यता असल्याने, प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे.

Best Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! हंगामी पगारवाढ, ग्रॅच्युइटीबाबत मोठी घोषणा, किती रुपये मिळणार?

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com