Mumbra local Accident: दररोज 7 मृत्यू... मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; 20 वर्षांची धक्कादायक आकडेवारी

Mumbai Train Passenger Death Report: आज घडलेल्या घटनेनंतर आता मुंबईमधील ट्रेन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Train Accident Death Report: मुंबईमधून एक भीषण रेल्वे अपघाताची बातमी समोर आली असून मुंब्रा स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. मुंबई ते कर्जत आणि कसारा ते मुंबई  या दोन लोकल एकमेकांना घासल्याने दारात उभे असलेले प्रवासी खाली कोसळले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकल ही मुंबईची जिवनवाहिनी समजली जाते. रोज लाखो मुंबईकरांना सेवा पुरवणाऱ्या लोकलच्या अनेक गंभीर दुर्घटनाही घडतात ज्यामध्ये निष्पाप चाकरमान्यांना जीव गमवावा लागतो. प्रशासाकडून विविध उपाययोजना केल्यानंतरही ही मृत्यूंची संख्या काही घटलेली नाही. आज घडलेल्या घटनेनंतर आता मुंबईमधील ट्रेन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

2024 मध्ये मुंबईमधील ट्रेन अपघातात 2,468 मृत्यू नोंदवले गेले, म्हणजेच सरासरी दररोज सुमारे 7 मृत्यू. यापैकी 1,151 मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना (ट्रेसपासिंग) झाले, तर 590 मृत्यू चालत्या गाडीतून पडून मृत्यू झाले. 

2023 मध्ये 2,590 मृत्यूनोंदवले गेले म्हणजेच दररोज सुमारे 7 मृत्यू. यापैकी 1,277 मृत्यू रुळ ओलांडताना आणि *90 मृत्यू गाडीतून पडून झाले. गेल्या 20 वर्षांत: 2005 ते 2024 या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून 52,300 मृत्यू झाले, म्हणजे सरासरी वर्षाला 2,615 मृत्यू.  यापैकी मध्य रेल्वेवर 29,321 आणि पश्चिम रेल्वेवर 23,000 मृत्यू नोंदवले गेले.

Advertisement

Raja Raghuvanshi Case : हनिमून ते हत्या… पत्नी सोनम सापडली, राजा रघुवंशी प्रकणात दोन आठवड्यात काय घडलं?

रेल्वे प्रवासात अशी घ्या काळजी!

वेळेचे नियोजन करा: गर्दीच्या वेळा टाळण्यासाठी शक्यतो लवकर किंवा उशिरा प्रवास करा. स्टेशनवर वेळेत पोहोचा जेणेकरून घाई होणार नाही.

प्लॅटफॉर्मवर सावध रहा: प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहू नका. पिवळ्या रेषेच्या आत राहा आणि ट्रेन येताना मागे सरकून सुरक्षित अंतर ठेवा.

ट्रेनमध्ये चढताना-उतरताना काळजी घ्या: ट्रेन पूर्ण थांबल्याशिवाय चढू किंवा उतरू नका. घाई करू नका आणि हाताने रेलिंग पकडा. दाराजवळ गर्दी करणे टाळा.

ट्रेनच्या बाहेर झुकू नका: चालत्या ट्रेनमधून बाहेर झुकणे किंवा हात बाहेर काढणे धोकादायक आहे. दाराजवळ उभे राहणे टाळा.

आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार रहा: आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि स्टेशनवरील मदत केंद्राची माहिती ठेवा. ट्रेनमधील आपत्कालीन खिडकी आणि उपकरणांचे स्थान जाणून घ्या.

Advertisement

महिलांसाठी विशेष काळजी: महिला डब्याचा वापर करा, विशेषतः रात्रीच्या वेळी. असुरक्षित वाटल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घ्या.

प्रथमोपचार किट सोबत ठेवा: छोट्या जखमांसाठी बँडेज, अँटिसेप्टिक क्रीम यासारख्या गोष्टी बॅगेत ठेवा.

ट्रेनच्या वेळा तपासा: ट्रेनच्या वेळापत्रकाची माहिती घ्या, जेणेकरून गोंधळ किंवा घाई होणार नाही.

स्वतःची काळजी घ्या: प्रवासादरम्यान पाण्याची बाटली आणि हलका खाण्याचा पदार्थ सोबत ठेवा. थकवा किंवा डिहायड्रेशनमुळे चक्कर येण्याचा धोका टाळा.