मुंबई: महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शरद पवार, नारायण राणेंना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाकडे मविआच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र दिनानिमित आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याकडे महाविकास आघाडीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली आहे तर महायुतीशी संबंधित माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आज माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मुंबईत आहेत मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर जाण टाळले आहे.
शरद पवारांना आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला असता संबंधित कार्यक्रम एका महायुतीशी संबंधित पक्षाचा आहे त्यामुळे त्यांच्या स्टेजवर जाण्याचा सवाल उपस्थित होतं नाही असं उत्तर पवारांकडून देण्यात आलं आहे. शरद पवार मुंबई आहेत पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी घेतलेले नाहीत. तरीही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कळवलं आहे तर सुशीलकुमार शिंदे यांनी अद्याप होकार अथवा नकार देखील कळवलेला नाही. तर उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत त्यामुळे ते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दुसरीकडे महायुतीशी संबंधित असणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)