संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur RDX Company Blast : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेड येथे मोठा स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोसिव्ह लिमिटेड येथे मध्यरात्री 12.30 वाजताच सुमारास PP 15 मधील CB 1 प्लान्टमध्ये स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून चार जणं गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर 9 जणं जखमी झाली आहेत. या प्लान्टमध्ये hmx TNT आणि RDX ची निर्मिती होते. काम सुरू असताना प्लान्टमध्ये धूर निघत असल्याचं लक्षात आल्याने सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
मात्र RND लॅबमध्ये असणारा मयूर नावाच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्फोट इतका मोठा होता की, त्यानंतर मलबा आणि इमारत सहित्याची तुकडे हे दूरवर फेकले. यातील एक मोठा दगड हा त्या व्यक्तीला लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या स्फोटातून सहा जखमी कामगारांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दारूगोळा आणि स्फोटके निर्मिती करणाऱ्या काही सरकारी आणि खासगी आयुध निर्माण करणारे कारखाने विदर्भात असून लष्करी वापरासाठी स्फोटके, बॉम्ब, अग्निबाण, बॉम्बचे कवच तसेच अन्य शस्त्रे आदींचे उत्पादन केले जाते. नागपूर जवळच्या स्फोटके निर्मितीच्या कारखान्यांत गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या स्फोटात 17 हून अधिक कामगारांचे जीव गेले आहे.
नक्की वाचा - Cotton Farmer: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ
यापूर्वी घडलेल्या घटना
17 डिसेंबर 2023 रोजी याच कंपनीत विस्फोट घडला होता. त्यात 9 कामगारांचा मृत्यू आणि 3 गंभीर जखमी झाले होते. नागपूर जिल्ह्यात आणि आसपास विस्फोटक निर्मितीचे कितीतरी कारखाने असून तिथे विस्फोट होण्याच्या घटना नवीन नाहीत.
24 जानेवारी 2025 : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डीनेस फॅक्टरीमध्ये या वर्षी पहिल्याच महिन्यात विस्फोट घडून सात कामगार ठार तर 5 जखमी झाले होते.
27 जानेवारी 2024 : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डीनेस फॅक्टरीमध्ये गेल्या वर्षी देखील जानेवारी महिन्यातच भीषण स्फोट झाला होता ज्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.
मे 2016 : वर्धा जिल्ह्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) भीषण आगीनंतर झालेल्या स्फोटात लष्करच्या दोन अधिका-यांसह 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी होते.
17 डिसेंबर 2023 : नागपूरजवळील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीमध्ये स्फोट होऊन 9 कामगार होरपळून मृत्यूमुखी पडले होते.
13 जून 2024 : अमरावती मार्गावरील धामना येथील चामुंडी एक्सप्लोजिव कंपनीतही स्फोट होऊन एकूण नऊ कामगारांचा जीव गेला होता.