Nagpur Crime : नागपुरात मेव्हणीमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत पत्नी जबर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे आरोपी जुबेर गुलाम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील या दाम्पत्यामध्ये पत्नीच्या बहिणीवरुन वाद निर्माण झाला होता. मेव्हणीला घर बांधण्याकरिता दिलेले 5 लाख रुपये परत मागून आण यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला. यानंतर आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने वार केलं. यात महिला जबर जखमी झाली आहे. या प्रकरणातील आरोपी समशेर रमजान शेख यांच्याविरोधात नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घर बांधण्याकरिता त्यांनी मेव्हणीला पाच लाख रुपये उधार दिले होते. आरोपी हा पत्नीला तिच्या बहिणीकडून 'पैसे परत मागून आण' या कारणावरून नेहमी मारहाण करीत होता.
नक्की वाचा - Pune News: क्लास वन ऑफिसरकडून घरात स्पाय कॅमेरे, पत्नीचे नको ते व्हिडीओ काढले, पुढे जे घडले ते...
आरोपीने याच कारणावरून पत्नीसोबत वाद घातला. रागाच्या भरात नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने रेशमाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी जुबेर गुलाम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.