जाहिरात

Nagpur Election 2026: निवडणुकीच्या तोंडावर कारवाईचा दणका! भाजपकडून 32 जणांवर निलंबनाची कारवाई

अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या 32 बंडखोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

Nagpur Election 2026: निवडणुकीच्या तोंडावर कारवाईचा दणका! भाजपकडून 32 जणांवर निलंबनाची कारवाई

Nagpur Municiple Corporation Election 2026: महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सर्वाधिक असंतोष पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. याबंडखोरांना आता पक्षाने जोरदार दणका दिला आहे. 

भारतीय जनता पक्षाकडून बंडखोरांना दणका

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत पक्षांतर्गत बंडाळी मोडीत काढण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या 32 बंडखोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

Uddhav Raj Interview: 'मराठी हिंदू नाही का?', ठाकरेंचे 'ते' 3 प्रश्न महायुतीला चेकमेट करणार?

भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही घोषणा केली असून, यामध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ​पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवारी वाटपावरून नाराज झालेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी अपक्ष किंवा इतर मार्गाने निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.

32  जण निलंबित
वारंवार समज देऊनही बंडखोरी मागे न घेतल्याने अखेर पक्षाने ही टोकाची भूमिका घेतली आहे. निलंबित केलेल्या ३२ जणांमध्ये माजी नगरसेवक दीपक चौधरी यांचाही समावेश आहे. पक्षशिस्त ही कोणाही व्यक्तीपेक्षा मोठी आहे, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. ​केवळ निवडणूक लढवणाऱ्यांवरच नाही, तर पडद्यामागून अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवरही भाजपचे बारीक लक्ष आहे.

नक्की वाचा - Uddhav Raj interview: ड्रग्ज, पैसा, राजकारण अन् मुंबईकर! राऊतांचे टोकदार प्रश्न, ठाकरे बंधुंची धाकड उत्तरं

जर त्यांनी तातडीने आपली वागणूक सुधारली नाही आणि पक्षाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही, तर त्यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार असेल, असा स्पष्ट इशारा तिवारी यांनी दिला आहे. या कारवाईमुळे निष्ठावंतांमध्ये समाधान असले तरी, बंडखोरांच्या गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com