Nagpur Accident Students Death: नागपुरमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लाॅ स्कूल विधी विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून पडून हा अपघात झाला, दुर्दैवाने दोघांचेही मोबाईल ऑफ असल्याने आणि वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा जीव गेला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Jalna Crime: नाशिक, अमरावतीनंतर जालना हादरलं! साहिल अन्सारीचं विकृत कृत्य; कॉलेज तरुणीसोबत काय घडलं?
मदतीसाठी धावा, रात्रभर तडफडून जीव सोडला
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील (MNLU) दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कच्च्या, अंधाऱ्या रस्त्यावरून घसरून ते खोल दरीत पडल्याने हा अपघात झाला. वेळेत मदत न मिळाल्याने दोघांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. सक्षम बन्सोड (वय २०) आणि आर्यन सोनटक्के (वय २०) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सक्षमचे वडील वर्धा येथे सहदिवाणी न्यायाधीश आहेत, तर आर्यनचे वडील वकील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही बुधवारी रात्री जेवणासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा परत येताना विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या कच्च्या आणि धोकादायक रस्त्यावर त्यांची मोटारसायकल घसरली आणि ते खोल दरीत पडले. अपघात निर्जन ठिकाणी झाल्याने कोणाच्याही लक्षात आला नाही. रात्रभर दोघेही दरीत जखमी अवस्थेत पडून होते. त्यांच्या मोबाईलमुळेही संपर्क होऊ शकला नाही, एकाचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता, तर दुसऱ्याचा मोबाईल हॉटेलमध्ये राहिला होता. त्यामुळे वेळेत मदत मिळू शकली नाही.
Dombivli News: डोंबिवलीत भाजी मार्केटमध्ये मोठी कारवाई! तब्बल 114 दुकाने सील; नेमकं काय सुरु होतं?
नागपूर हादरलं
विद्यार्थी रात्री वसतिगृहात परतले नाहीत, तेव्हा मित्रांनी आणि वॉर्डनने शोधाशोध सुरू केली. मात्र पहाटेपर्यंत त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर सकाळी एका व्यक्तीला दरीत दोन मृतदेह दिसले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world