जाहिरात

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूर ते गोवा 8 तासात? शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू

हा महामार्ग सुमारे 805 किलोमीटर लांबीचा असेल आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे.

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूर ते गोवा 8 तासात? शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू

विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीकडून पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया एमएसआरडीसीने सुरू केली आहे. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीनं पर्यावरण विभागाच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा महामार्ग सुमारे 805 किलोमीटर लांबीचा असेल आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. ज्यात वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी अंदाजे 86,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 27,000 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्याची योजना आहे. हा महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी या तीन प्रमुख शक्तीपीठांना जोडेल, ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.  

Nashik accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

नक्की वाचा - Nashik accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच या प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम सुरू झाले होते. 9385 हेक्टर जमीन लागणार प्रकल्पासाठी 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन एमएसआरडीसीला करावे लागणार आहे. त्यामध्ये 265 हेक्टर वन जमिनीचा समावेश आहे. काही अहवालांनुसार, राज्य सरकारने भूसंपादनाच्या अधिसूचना रद्द केल्या होत्या. ज्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यात अनिश्चितता निर्माण झाली होती. ती आता दूर झाली. या प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवास सध्याच्या 18 तासांवरून 8 तासांवर येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यातील दळणवळण आणि विकासाला मोठी चालना मिळेल.