
शरद सातपुते, सांगली
ShaktiPeeth Highway : शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील 19 गावे बाधित होणार आहेत. त्यामुळे काही शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आहेत. तर काही पूर्ण विरोधात आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळे बागायत शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. सांगलवाडी, मनेराजुरी अशा अनेक भागात बागायत शेती एक्सपोर्ट केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचा याला मोठा विरोध आहे.
त्याचबरोबर सांगली, कर्नाळ, सांगलवाडी अशी अनेक गावे पूरपट्ट्यातील आहेत. त्यामुळे नवीन महामार्गामुळे भरावामुळे पुराचा धोकाही जास्त वाढणार आहे, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मोजणी देखील होऊ दिली नाही. अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादीचेही अनेक प्रसंग घडले आहेत.
( नक्की वाचा : Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )
शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने, शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये. गाव निहाय बैठका घ्याव्यात. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये. शेतकऱ्यांना समजण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. पर्यायी रस्ता असताना पूरपट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारने घातला आहे. पुराचा धोका होतो की नाही वडनेर समितीने याबाबत अहवाल देणे गरजेचे होते. विकासाला विरोध नाही, पण विकास होत असताना शेतकऱ्यांचं हित सुद्धा जपलं पाहिजे. बळजबरी करू नये, विश्वासात घेऊन यासाठी गावनिहाय बैठक घेऊन मध्यस्थी करू असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे
काही नेत्यांच्या घशात पाच-पन्नास कोटी जाण्यासाठी हा शक्तिपीठ महामार्ग सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत तो होऊ देणार नाही, असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तर विकासाच्या दृष्टीने महामार्ग होणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे अनेकांचे कल्याण होणार आहे. दुष्काळी भागातून जाणारा महामार्ग असल्याने अनेक शेतकरी समर्थनात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. विकासाच्या दृष्टीने शक्तीपीठ होणे गरजेचे आहे. अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली.
(नक्की वाचा- Nalasopara : 32 लाखांच्या बदल्यात घेतले 4 फ्लॅट, पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरचा टोकाचा निर्णय)
'शक्तीपीठ' विरोधात आंदोलनातील 350 ते 400 आंदोलकावर गुन्हा
नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात 350 ते 400 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह इतरही काही नेत्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांसह नेत्यांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शिरोली पुलाजवळ तब्बल दोन तास रोखून धरला होता. या मोर्चापूर्वी आंदोलकातील नेतृत्व करण्याऱ्या नेत्यांना नोटीस बजावण्यात आलेली. पण तरीही हे आंदोलन करण्यात आलं. यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही महामार्ग रोखून धरत आंदोलन केल्यामुळे शिरोली पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world