जाहिरात
12 days ago

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आता तिच्या आई- वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली असून नव्याने चौकशीची मागणी करत याचिका दाखल केली आहे. 

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांचा एल्गार, ओबीसींसाठी मैदानात उतरणार

ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसींसाठी मैदानात उतरणार असून शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जळगाव - धुळे रोडवरील मानराज मैदानात ओबीसीचा महामेळावा पार पडणार आहे. जळगावसह इतर जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या परिषदेला हजेरी लावतील असं अखिल भारतीय समता परिषदेकडून सांगण्यात येतय.. 

मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी उघड उघड नाराजी पक्षाध्यक्ष अजित पवारांवर व्यक्त केली होती. दरम्यानच्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा असतांनाच भुजबळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. 

विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ या दुसऱ्या ओबीसी नेत्याला मंत्रीपदाची पुन्हा संधी मिळेल असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात असतानाच भुजबळांचा हा ओबीसी महामेळावा महत्त्वाचा ठरणार असून या मेळाव्याच्या आडून भुजबळ आपली ताकद पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतायत का ? असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. 

Mumbai News: मुंबई विमानतळावर 11 कोटींचे कोकेन जप्त

मुंबई विमानतळावर येणारा एक ब्राझिलियन नागरिक ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) मुंबई अधिकाऱ्यांनी सौ पाउलोहून फ्लाइट एएफ २१८ मधून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेतले.

प्रवाशाची वैयक्तिक झडती घेतली असता, आतील कपड्यांमध्ये चिकट द्रव पदार्थ असलेले सात पाउच आढळले. फील्ड टेस्ट किटद्वारे चाचणी केल्यावर, चिकट द्रव पदार्थ कोकेनसाठी पॉझिटिव्ह आढळला. प्रवाशाने देखील या पाउचमध्ये कोकेन घेऊन जात असल्याचे मान्य केले. बेकायदेशीर बाजारात ११.१ कोटी रुपये किमतीचे १११० ग्रॅम द्रव स्वरूपात कोकेन जप्त करण्यात आले.

जप्त केलेले कोकेन एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आले आणि एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Nagpur News: कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, गुमगाव येथील वेणा नदीच्या पुलाखालील घटना

कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे

आज घडली आहे. १५ ते २० भटक्या कुत्र्यांनी गुमगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वेणा नदीच्या पुलाखाली मुलीवर हल्ला करत रक्तबंबाळ केले आणि त्यात त्या चिमुकल्या मुलीचा जीव गेला. हर्षिता रामसिंग चौधरी असे त्या मृत मुलीचे नाव आहे.

        

Solapur News: सोलापुरात पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच मारहाण

- सोलापूर शहरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर 

- सोलापूर शहर हद्दीतील फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच झाली मारहाण 

- अरविंद माने असे मारहाण झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव 

- नाईटन्या उर्फ ओंकार संतोष नलावडे असे पोलीस निरीक्षकांना मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव 

- दोन - तीन व्यक्तींमध्ये तक्रार झाली होती ती तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आल्यानंतर घडला प्रकार 

- सदर नाईटन्या उर्फ ओंकार संतोष नलावडे या आरोपीच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

LIVE Updates: सह्याद्री साखर कारखान्यात भीषण स्फोट, 5 कामगार जखमी

माजी सहकार मंत्र्यांच्या कराड येथील  कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट

पाच कामगार गंभीर जखमी

सह्याद्री कारखान्यात बॉयलरची ट्रायल सुरू असताना गॅसच्या दाबानं बॉयलरचा स्फोट 

या घटनेत चार ते पाच परप्रांतिय कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

 शैलेश भारती,

 धर्मपाल (उत्तर प्रदेश) आणि अमित कुमार (बिहार), अशी जखमींची नावे 

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार  सुरू 

 स्फोटाचा आवाज पाच किलोमीटर पर्यंत

स्फोटाने कारखाना परिसर हादरला

LIVE Updates: क्रिकेटर युजवेंद्र चहल- धनश्री वर्माचा घटस्फोट..

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा चा घटस्फोट..

वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला होता..

आज तातडीनं चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाबाबत निकाल देण्याचे हायकोर्टाकडून कुटुंब न्यायालयाला निर्देश देणायत आले होते..

घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं दिला होता नकार..पण आज झालेल्या सुनावणी मध्ये हा घटस्फोट झाला आहे..

  आयपीएलपूर्वी तातडीनं घटस्फोट मिळवण्यासाठी दांपत्यानं कुटुंब न्यायालयाच्या निकालाला दिलं होतं हायकोर्टात आव्हान..

चहल आणि धनश्री वर्मानं परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी दाखल केली होती.

Live Update : 'उद्धव ठाकरेंना विचारा, संजय राठोड यांना क्लिनचिट कोणत्या मुद्द्यावर दिली?'

उद्धव ठाकरेंना विचारा, संजय राठोडला क्लिनचिट कोणत्या मुद्द्यावर दिली? चित्रा वाघ यांचा अनिल परबांना विधान परिषदेत सवाल

माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलं. म्हणून मी इथं बोलतेय. ती फार मोठे वकील असाल. खूप पोपट पंडीत असाल. तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते चित्रा वाघ...संजय राठोडला क्लिन चिट दिली नसती. तर ते जे म्हणतात ते झालं नसतं. 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा वांद्रे कोर्टात दाखल

  • क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दाखल 
  • घटस्फोटाच्या याचिकेवर आज होणार सुनावणई

Live Update : प्रख्यात उद्योजक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक प्रख्यात उद्योजक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ श्रीकर परदेशी, गेट्स फाउंडेशनचे भारतातील संचालक हरी मेनन, मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या जागतिक मलेरिया प्रकल्पाचे संचालक फिलिप वेलकॉफ आदी उपस्थित.

Live Update : लातूर जिल्ह्यात 24 हजार382 शेतकऱ्यांची केवायसी नाही;21 कोटी 77 लाख रुपये इतका निधी वितरित करणे शिल्लक

लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झालं होतं. शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून 466 कोटी 40 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.. हा निधी वाटपाची कार्यवाही डीबीटी प्रणाली द्वारे सुरू आहे.. आज पर्यंत जिल्ह्यात 3 लाख 87 हजार पाचशे पाच लाभार्थी मदतीसाठी पात्र ठरले असून त्यापैकी 3 लाख 50 हजार 373 लाभार्थ्यांना 387 कोटी 34 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.. परंतु अद्याप 24 हजार 382 शेतकऱ्यांनी इ केवायसी न केल्याने  21 कोटी 77 लाख रुपये इतका निधी वितरित करणे शिल्लक आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी इ केवायसी 25 मार्चपर्यंत करून घ्यावे असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..

Live Update : औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा कवच

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्याने एकीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला असताना, बुधवारी कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये, यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले. या माध्यमातून कबरीचे सुरक्षा कवच वाढविण्यात आले आहे.

Live Update : संभाजीनगरच्या आझाद चौकातील लाकडांच्या दुकानांना भीषण आग

संभाजीनगरच्या आझाद चौकातील लाकडांच्या दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती आहे. या 

आगीत काहीजण अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.