तेजस मोहातुरे, भंडारा
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता. उद्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची चर्चा होणार आहे. कोणत्या पक्षाने कुठे कुठे गडबड केली ते उद्या समजेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
आज फॉर्म भरून झालेले आहेत. महायुतीतही तिढा आहे. खरी स्पष्टता उद्या स्पष्ट होईल. कोणकोणत्या पक्षाने आणि कुठे-कुठे काय गडबडी केलेली आहे, ते उद्या आपल्याला समजेल. आज आम्ही माहिती घेत आहोत, आमचं सगळं लक्ष आहे. आमचे नेते महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथला उद्या मुंबईत आहेत, आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करतील, असं नाना पटोले यांनी म्हटलं. जिथे कुठे असे काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील ते निराकरण करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहणार असल्याचं नाना पटोले यांनी मांडली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार आर आर पाटलांना बदनाम करायचं पापं करतायेत
अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यावरुन दिवंगत आर आर पाटील यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं. याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विरोधात 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा पुरावा देत 2014 मध्ये बोंबाबोंब केली होती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वाचता येत नाही, कळत नाही की खरोखरच घोटाळा झाला होता की नाही, की कोणालाही बदनाम करायचं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य)
अजित पवार त्यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे आता अजित पवार भ्रष्टाचाराच्या वॉशिंग मशीनमधून धुवून बाहेर निघालेत आणि भाजपनं त्यांना स्वच्छ केलं आहे. राज्यासाठी आर आर पाटलांसारखं एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या नावानं महाराष्ट्राला घाणीपासून मुक्त करण्याचं काम केलं. अनेक नवीन नवीन योजना या महाराष्ट्रात आणल्यात. अशा व्यक्तींना त्यांच्या हयात नसतानी बदनाम करणे सगळ्यात मोठं पापं आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- आर आर पाटलांनी केसाने गळा कापला; अजित पवार असं का म्हणाले?)
भाजप आणि अजित पवार हे आपली पापं लपवण्यासाठी एका चांगल्या व्यक्तिमत्वाला स्वर्गीय आर आर आबांना बदनाम करायचं पापं करत आहे. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. या खालच्या पातळीवर अजित पवार आणि भाजप राजकारण करत आहे, त्यांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल, असा निशाणा पटोले यांनी अजित पवारांवर साधला.