नांदेड: राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचे, वेळेवर तसेच योग्य उपचार मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच नांदेड ग्रामीण रुग्णालयात एका वृद्ध पेशंटच्या व्यक्तीच्या पायाला उंदराने कुरतडल्याचा प्रकार घडला होता. अशातच आता चक्क पेशंटच्या अंगावर उंदरे फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
राधे-राधे म्हटल्याने चिमुरडीला बेदम मारहाण, मुख्याध्यापिका ईला कोल्विनला अटक
एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे. दुसऱ्या रुग्णच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ग्रामीण रुग्णलयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आरोग्य यंत्रनाच सलाइनवर असल्याचे दिसून येत आहे. आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहावे लागणार आहे.
Pune News: पुण्यात खड्ड्याने घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी; नागरिकांचा संताप