समाधान कांबळे, हिंगोली
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसानेच कायद्याची आणि नात्यांची पायमल्ली केल्याची एक संतापजनक घटना हिंगोली जिल्ह्यामधून समोर आली आहे. नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या पत्नीची संमती नसताना आणि घटस्फोट न घेता दुसरे लग्न थाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे बेकायदेशीर लग्न रोखण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला पोलीस पतीने भर मंडपात बेदम मारहाण केली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील एका मंगल कार्यालयात हा हायव्होल्टेज ड्रामा घडला.
पहिल्या पत्नीच्या माघारी दुसरे लग्न; जाब विचारताच मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत गजभारे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो नांदेड पोलीस दलात कार्यरत आहे. प्रशांत हा आपली पहिली पत्नी असतानाही, तिच्या माघारी वसमत शहरातील 'कृष्ण मंगल कार्यालय' येथे दुसरे लग्न करत होता.
(नक्की वाचा- Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)
पती दुसरे लग्न करत असल्याची कुणकुण पहिल्या पत्नीला लागली. ती तातडीने नातेवाईकांसह वसमत येथील लग्न मंडपात दाखल झाली. तिने प्रशांतला या बेकायदेशीर विवाहाबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, संतापलेल्या नवरदेव प्रशांतने सर्व पाहुण्यांदेखत स्वतःच्या पहिल्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
(नक्की वाचा- FDA Action: मुंबईतील प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम'ला FDAने ठोकले टाळे! तपासणीदरम्यान दुकानात काय आढळलं?)
पोलीस पतीसह 11 जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले. लग्नाच्या मंडपात झालेल्या या राड्यानंतर वसमत शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आहेत. पोलिसांनी बेकायदेशीर दुसरे लग्न करणे आणि पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी नवरदेव पती प्रशांत गजभारे याच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी स्वतः पोलीस दलात असल्याने या घटनेमुळे नांदेड आणि हिंगोली पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशांत गजभारे याच्यावर निलंबनाची ( किंवा विभागीय चौकशीची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.