Nashik News: सहा अधिकारी, तब्बल 6 तास चौकशी! रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार; SIT ने काय काय विचारलं?

खरातने आयोगाच्या माध्यमातून कधी मदत मागितली होती का, तसेच शिवनिका संस्थानातील आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत कशी होती, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Ashok Kharat Case Update: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या एसआयटीच्या रडारवर आल्या आहेत. रविवारी रुपाली चाकणकर यांची एसआयटीमार्फत कसून चौकशी करण्यात आली. SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंसह एकूण 6 अधिकाऱ्यांमार्फत चाकणकरांची जवळपास साडेपाच तास चौकशी झाली. यावेळी चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार कऱण्यात आला. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  २०१८ ते २०२६ या प्रदीर्घ काळात अशोक खरात याच्याविरोधात कोणत्याही महिलेने तक्रार केली होती का, आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकरांना याची कल्पना होती का, यावर तपासाचा मुख्य रोख होता. खरातने आयोगाच्या माध्यमातून कधी मदत मागितली होती का, तसेच शिवनिका संस्थानातील आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत कशी होती, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

Advertisement

चाकणकर आणि त्यांच्या भगिनींची खरातशी झालेली ओळख आणि त्यांच्यात झालेले कथित आर्थिक व्यवहार किंवा डोनेशन यावरही एसआयटीने प्रश्न उपस्थित केले. या चौकशीमुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

PM Narendra Modi : पेट्रोल-डिझेल, सोनं खरेदीबाबत PM नरेंद्र मोदींचं देशवासीयांना सर्वात मोठं आवाहन, म्हणाले..


SIT कडून रुपाली चाकणकरांना काय काय विचारण्यात आले? 

  •  2018 ते 2026 या काळात अशोक खरातबाबत तुमच्याकडे काही महिलांनी कधी तक्रार केली होती का ?
  • खरातच्या गैरकृत्यांबाबत तुम्हाला काही कल्पना होती का ?
  • महिला आयोगाच्या अध्यक्ष असतांना खरातने तुमच्याकडे कधी काही मदत मागितली होती का ?
  •  शिवनिका संस्थानशी तुम्ही कसे आणि कधीपासून जोडले गेले ? संस्थानमध्ये आर्थिक व्यवहार नक्की कसे चालायचे ? खरात सोबत भक्त कसे जोडले जायचे ?
  • तुमची, तुमच्या बहिणीची अशोक खरातसोबत ओळख कधी आणि कशी झाली ?
  • तुमच्याकडून अशोक खरातने काही डोनेशन किंवा ईतर स्वरूपात पैसे स्वीकारले आहेत का ?

नक्की वाचा >> CM विजय यांचं भाषण सुरु होतं, अचानक त्रिशा कृष्णननं असं काही केलं..फिल्म इंडस्ट्रीसह राजकारणात चर्चा, VIDEO