जाहिरात

Sushma Andhare: रुपाली चाकणकर तंत्रमंत्र करतात, अनामिका कापली अन्.. सुषमा अंधारेंनी थेट फोटो दाखवले!

महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतात, पदराने पाय पुसत नाहीत तर अक्षरशः लोटांगण घेतात. या तंत्र मंत्र अघोरी विद्येमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे विशेष आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

Sushma Andhare: रुपाली चाकणकर तंत्रमंत्र करतात, अनामिका कापली अन्.. सुषमा अंधारेंनी थेट फोटो दाखवले!

Sushma Andhare On Ashok Kharat Rupali Chakankar Case:  कॅप्टन अशोक खरातने केलेल्या बलात्कार प्रकरणात होत असलेल्या नवनव्या खुलाश्यांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढत आहेत. आत्तापर्यंत रुपाली चाकणकर या कॅप्टन अशोक खरात चालवत असलेल्या संस्थेमध्ये सदस्या असल्याचे समोर आले होते. मात्र या  प्रकरणात आता सर्वात मोठा दावा करण्यात आला असून रुपाली चाकणकर या स्वत: च तंत्रमंत्र करत होत्या, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे. 

रुपाली चाकणकर हे स्वतः तंत्रमंत्र करतात... 

"कॅप्टन खरातची कुंडली काढणाऱ्या पत्रकाराला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धमकावले होते. खबरदार पुढारीचा वृत्तसंपादक होता, त्याला महिला आयोगाने जी पत्रे पाठवली होती. त्याच्यावर चाकणकरांनी दबाव आणला होता, त्याचे पुरावे समोर आले आहेत. हे तंत्र-मंत्र, काळी जादू या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतात, पदराने पाय पुसत नाहीत तर अक्षरशः लोटांगण घेतात. या तंत्र मंत्र अघोरी विद्येमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे विशेष आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

VIDEO: 'देवाभाऊ, औरंगजेबाची कबर उखडून टाका, त्याजागी मुतारी बांधा', भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

तसेच  एका पिडितेने सांगितले की, रुपाली चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करतात. त्या स्वतःची अनामिका कापून घेतात. ही विद्या सोमवती अमावस्येला करतात. अनामिका (Ring Finger) हे हाताच्या करंगळी आणि मधल्या बोटाच्या (middle finger) मधले बोट आहे. हे बोट  यश आणि आकर्षण याच्याशी जोडलेले आहे. मंत्रोउच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षण करता येते, असे आरोप सुषमा अंधारेंनी केलेत. हे आरोप करत असतानाच सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांचे काही फोटोही दाखवले ज्यामध्ये त्यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसत आहे. 

"ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवले आहे त्या अमिका कापून तंत्र मंत्र विद्या करतात. सोमवती अमावस्येला त्या असल्या तंत्र मंत्र विद्या करतात. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत ही जखम होती. हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा करत असतील? पीडित महिलांच्या समोर हे घडलं आहे. चाकणकर बाईंना सर्व गुन्ह्यांची माहिती होती. त्यांनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. रुपाली चाकणकर यांनी खरातांच्या पीएच्या प्रकरणातही सहभाग नोंदवला. या पत्रकार परिषदेंमधून आमची मागणी आहे, चाकणकरांना तातडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.

रुपाली चाकणकर फरार होण्याआधी अटक करा 

पुढे बोलताना म्हणाल्या की,  "समोरासमोर बसवून चौकशी झाली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. अशा पद्धतीने तंत्र मंत्र पद्धतीत जर चाकणकर गुंतल्या असतील तर  त्यांना त्यांच्या पदावरुन बाजूला केले पाहिजे. रुपाली चाकणकर फरार होण्याआधी त्यांना अटक झाली पाहिजे. मागच्या वर्षभरात त्यांनी अनेक वेळा अनेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे."

Ashok Kharat Case: मोठी बातमी! महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार? पोस्टने खळबळ

तसेच "रुपाली चाकणकर आणि खरातचे सीडीआर तपासले पाहिजेत. अनेक पिडीतांनी चाकणकर रात्री दोन दोन वाजता आम्हाला धमकावत होत्या, अशी तक्रार केली आहे.  ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्त्रोत तपासले पाहिजेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांना किती मानधन मिळते आणि किती संपत्ती घेता येते, त्याची चौकशी झाली पाहिजे."

Listen to the latest songs, only on JioSaavn.com