Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचे रायगड बिझनेस कनेक्शन उघड! महत्त्वाचा खुलासा; खरात प्रकरणी अडचणी वाढल्या

Ashok Kharat Case Rupali Chakankar: तटकरे यांच होम ग्राऊंड असलेल्या रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे कंस्ट्रक्शन व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Rupali Chakankar Raigad Connection:  नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रुपाली चाकणकरांचे आता रायगडमधले व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत. तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा इथे रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Ashok Kharat Case: 'मी महिला...', रुपाली चाकणकरांचा SIT चौकशीला हजर राहण्यास नकार, अजब कारण सांगितलं

रुपाली चाकणकरांचे रायगड कनेक्शन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टिकेचे लक्ष केल जात असताना दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर चौधरी व्यवसायिक कनेक्शन उघड करत तटकरे यांच्यावर आरोप केले होते.  याबाबत आता मोठी माहिती पुढे आली आहे. तटकरे यांच होम ग्राऊंड असलेल्या रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे कंस्ट्रक्शन व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे.  

Advertisement

आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कंस्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द येथे बहूमजली इमारत उभी केली आहे.  आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइन प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टींग, कर्जत रिव्हर राफ्टींग, गीता ॲग्रो ॲन्ड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटेलीटी, रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉट आणि कर्मा कंस्ट्रक्शन हे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहेत. 

Mumbai News: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 5 एप्रिलपर्यंत बंद, मुंबईकरांना केले भावनिक आवाहन; पर्यायी व्यवस्था?

दरम्यान, चाकणकर आणि चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे.  अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची हि केस असून यामुळे चाकणकरांचे चौधरी यांच्या सोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरु असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.