जाहिरात

Mumbai News: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 5 एप्रिलपर्यंत बंद, मुंबईकरांना केले भावनिक आवाहन; पर्यायी व्यवस्था?

Mumbai Dabbawala News: 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबेवाल्यांची सेवा उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे मुंबईकरांना जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

Mumbai News: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 5 एप्रिलपर्यंत बंद, मुंबईकरांना केले भावनिक आवाहन; पर्यायी व्यवस्था?
Mumbai Dabbawala News: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 5 एप्रिलपर्यंत बंद

Mumbai Dabbawala News: मुंबईची लाइफलाइन मानले जाणारे डबेवाले सहा दिवसांच्या सुटीवर जात आहेत, ज्यामुळे आजपासून मुंबईकरांच्या अडचणी वाढणार आहेत. आपल्या ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवासाठी डबेवाले 4 एप्रिलपर्यंत आपल्या गावी जात आहेत. 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत वार्षिक उत्सवामुळे डबेवाल्यांची सेवा उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे मुंबईकरांना जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. वार्षिक ग्रामदेवता उत्सवासाठी 6 दिवसांच्या सुटीवर जाणाऱ्या डबेवाल्यांबाबत डबेवाला संघटनेने मुंबईकरांना एक विशेष आवाहन केले आहे. या 6 दिवसांच्या कालावधीत डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंती संघटनेने केली आहे. डबेवाले 30 मार्च 2026 पासून पुढील सहा दिवस म्हणजेच 4 एप्रिल 2026 पर्यंत सेवा देऊ शकणार नाहीत.

ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी दरवर्षी घेतात सुटी 

दरवर्षी चैत्र महिन्यात डबेवाले आपल्या मूळ गावी होणाऱ्या ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवांना आणि जत्रांना उपस्थित राहण्यासाठी सहा दिवसांची सुटी घेतात. ही त्यांची पारंपरिक वार्षिक सुटी असल्याचे नमूद करत, डबेवाला असोसिएशनने सर्व ग्राहक आणि मुंबईकरांना या रजेच्या काळात डबेवाल्यांचे मानधन न कापण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईकरांच्या दिनचर्येवर होणार मोठा परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, डबेवाल्यांच्या या सहा दिवसांच्या सुटीमुळे सेवा पूर्णपणे ठप्प होईल. याचा परिणाम मुंबईतील सुमारे 80,000 ते 2 लाख नोकरदार वर्गावर होणार आहे, जे रोजच्या घरच्या जेवणासाठी डबेवाल्यांवर अवलंबून असतात. डबेवाले 5 एप्रिल 2026 पासून पुन्हा त्यांची नियमित सेवा सुरू करतील, तोपर्यंत या लोकांना स्वतः घरून जेवण आणावे लागेल किंवा बाहेरून जेवावे लागेल. मुंबईत सुमारे 5,000 डबेवाले कार्यरत आहेत. हे डबेवाले दररोज मुंबईतील सुमारे 2 लाख लोकांना त्यांच्या घरून कार्यालयापर्यंत दुपारचे जेवण पोहोचवतात. ही 130 वर्षांहून अधिक काळ चालत आलेली एक अनोखी आणि अतिशय अचूक डबा वितरण सेवा (Delivery Service) आहे.

मुंबईकरों तक घर का खाना पहुंचाने वाले डब्बेवाले

मुंबईकरांना घरचे जेवण पोहोचवणारे डबेवाले

जेवणाच्या डब्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल

पुढील सहा दिवस डबेवाले सुटीवर गेल्याने मुंबईकरांची दिनचर्या आणि आरोग्य दोन्ही बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टिफिन सेवेचा वापर करणाऱ्यांना आता बाहेरच्या जेवणावर अवलंबून राहावे लागेल किंवा घरच्या अन्नासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. विशेषतः जे लोक आजारी आहेत आणि पूर्णपणे घरच्या जेवणावर अवलंबून आहेत, त्यांचे सर्वाधिक हाल होणार आहेत.

(नक्की वाचा: LPG Crisis News: PNG गॅस संपेल का? पाइपलाइनद्वारे येणारा पीएनजी गॅस कुठून येतो? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर)

130 वर्षे जुनी सेवा एलपीजी (LPG) संकटाच्या सावटाखाली

महत्त्वाचे म्हणजे 130 वर्षे जुनी ही डबेवाला सेवा सध्या एलपीजी गॅसच्या गंभीर संकटाचाही सामना करत आहे. दररोज हजारो लोकांसाठी जेवण तयार करणाऱ्या टिफिन किचनमधील चुली आता गॅसअभावी थंड पडू लागल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई आणि त्याचा काळाबाजार यामुळे हे संकट ओढवले आहे. जे सिलिंडर सामान्य दरात मिळायचे ते आता काही भागांत 5 हजार ते 6 हजार रुपयांना काळ्या बाजारात विकले जात असल्याचा आरोप केला जातोय.

(नक्की वाचा: April 1 Rules Change: तुमच्या एका चुकीमुळे लागू शकतो मोठा दंड; 1 एप्रिलपूर्वी जाणून घ्या 5 नवीन नियम)

एलपीजी संकटाबाबत डबेवाला असोसिएशनने प्रतिक्रिया दिलीय की, खर्च वाढूनही त्यांनी जेवणाचे दर वाढवलेले नाहीत, पण परिस्थितीमुळे डब्यांची संख्या कमी करावी लागली आहे. गॅस न मिळाल्यास अनेक टिफिन किचन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. असोसिएशनने असंही म्हटले आहे की, "130 वर्षांच्या इतिहासात आम्ही टंचाई कधीच पाहिली नाही. आम्ही इतका महाग गॅस विकत घेऊ शकत नाही. जर सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर मुंबईची अशीही ऐतिहासिक सेवा कायमची ठप्प होऊ शकते."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com