Nashik Crime: नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात! रुद्राक्षांची भिती दाखवत तरुणीवर अत्याचार

बाहेरची बाधा झाल्याचे सांगून तिचे  पाप धुण्यासाठी तिला पापनाशक कुंडात आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर उंबराच्या झाडाला  ओल्या वस्तानिशी सात फेऱ्या  मारायला सांगितल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Bhondubaba Crime:  अशोक खरात प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदुबाबाचा अश्लील कांड समोर आलं आहे. निफाड तालुक्यातील प्रति  गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारणगाव खडक येतील मठातील  महेश गिरी या भोंदू बाबाच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या लासलगाव पोलिस स्थानकात पहाटे 2 वाजता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Kalyan News: भाजप पदाधिकाऱ्यासह वडिलांवर जीवघेणा हल्ला, 6 आरोपींची नेवाळी भागात काढली धिंड, प्रकरण काय?

नाशिकमध्ये आणखी एक भोंदुबाबा

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या माता पित्याने ही तक्रार दिली आहे.घरगुती समस्या व मुलीचे लग्न जमविण्यात येणारे अडथळे या समस्येने त्रस्त असलेल्या माता पित्याने आपल्या मुलीला या भोंदू बाबाकडे नेले होते. तिला बाहेरची बाधा झाल्याचे सांगून तिचे  पाप धुण्यासाठी तिला पापनाशक कुंडात आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर उंबराच्या झाडाला  ओल्या वस्तानिशी सात फेऱ्या  मारायला सांगितल्या.

Advertisement

त्यानंतर या भोंदू बाबाने संबंधित तरुणीला व्हाटसअपवर लज्जा उत्पन्न होईल असा प्रकाराचे संदेश टाकायला सुरुवात केली. तसेच दैवी विधी मार्गदर्शन  करण्यासाठी तिला एकांतात न्यावे लागेल असे सांगून तिला त्र्यंबककेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी स्वतःच्या गळ्यात असलेल्या रुद्राक्षाच्या माळांची भीती दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. अत्याचारानंतर पिडीत तरुणीला नाशिकला सोडून भोंदू बाबा पुण्याला मठाकडे निघून गेल्याचा आरोप पीडितेच्या माता पित्याने केला आहे.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या खडवलीत नदीकाठी भयंकर घटना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आपबिती कथन केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना कळविले. त्यानंतर त्याच्याविरोधात त्याच्याविरोधात जादू टोनाविरुद्ध  कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या भोंदुबाबाने आणखी महिला व तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता अंनिस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

Topics mentioned in this article