Kalyan Crime News Today : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडवली नदीकाठी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून नेमका कोणी आणि का केला? याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या एका पत्राने खळबळ, बदलापूर नगरपालिकेच्या सभेत राडा, वामन म्हात्रे संतापले, Video
पोलिसांनी नागरिकांना केलं मोठं आवाहन
मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,जर कोणाकडे या व्यक्तीबाबत काही माहिती असेल किंवा कोणी व्यक्ती हरवलेली असेल,तर त्यांनी तात्काळ कल्याण तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल,अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Kolhapur News: व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सावकाराचा महिलेवर वारंवार अत्याचार, 300 नग्न व्हिडीओ काढले अन्..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world