वैभव घुगे, नाशिक: राज्यातील महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai News : मुंबईत क्रौर्याचा कळस! 3 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ट्रेनच्या कचरापेटीत सापडला
समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर या नराधमाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी आरोपीवर नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपककुमार रमेशकुमार पाल असे या संशयिताचे नाव आहे.
पीडीत मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली ज्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. संशयित दीपककुमार पालने २०२४ पासून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेचलग्नाचे आमिष देत ती घरी एकटी असतांना तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
मुलीने लग्नाबाबत विचारले असता संशयित टाळाटाळ करत असल्याने मुलीने भेटण्यास नकार दिला. संशयिताने मुलीसह तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्याशी आठ वेळा संबंध ठेवले. यातून ती गरोदर राहिली. संशयिताने लग्नास नकार दिलाय... अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Bhiwandi News : खड्ड्यामुळे डॉक्टरचा हकनाक बळी; चूक कोणाची? स्थानिकांचा संतप्त सवाल