Nashik 400 Crore Cash Container Robbery: नाशिकमध्ये 2000 रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून याचप्रकरणात नाशिकमधील संदीप पाटील या व्यक्तीला अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तब्बल 400 कोटींची कॅश भरलेला ट्रक लुटला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चारशे कोटी रुपयांच्या जून्या नोटांनी भरलेला कंटेनर लुटल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि गोवा राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांकडे संदीप पाटील या तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनूसार 16 ऑक्टोबर 2025 ला गोव्यातून कर्नाटकला जाणारे पैशांनी भरलेले कंटेनर चोरली घाटात लुटण्यात आले होते.
दरम्यान या घटनेत तुझा सहभाग असल्याचा आरोप करत संदी प ह्याला फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या यासोबतच त्याचे मुंबई आग्रा महामार्गावर अपहरणही करण्यात आले होते, हे पैसे ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्याशी संबंधीत आहे असा दावा संदीप पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
5 आरोपी अटकेत
संदीप पाटील यांच्या तक्रारीनुसार, ऐन महापालिका निवडणुकीच्या काळातच म्हणजे 9 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या प्रकरणाची व्याप्ती बघता सखोल चौकशीसाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिक ग्रामीण पोलीसांनी विराट गांधी या बांधकाम व्यावसायिकासह 5 आरोपींना अटक केली आहे.
( नक्की वाचा : Nashik News: सून किंचाळत होती अन् सासरा काठीने मारत होता; पोटच्या मुलाने शूट केला सर्व प्रकार, पाहा VIDEO )
किशोर सावला आणि अझहर हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जातो आहे. हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असून कंटेनरमध्ये नक्की किती पैसे होते आणि ते कसे आले ? ते कोणाचे होते ? कुठून कुठे चालले होते ? यात नक्की कोणाचा हात आहे ? पोलीस यंत्रणांना याबाबत कोणतीच कल्पना का नव्हती ? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.