
प्रांजल कुलकर्णी, नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या - नाशिकच्या भगूर गावासाठी नगरोथान अभियना अंतर्गत दिलेल्या 24.38 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदार सरोज अहिरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या सरोज अहिरे?
"मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जाते. आजच्या कार्यक्रमाला येऊ नये यासाठी चौकाचौकात गुंड उभे केले होते, कार्यक्रमाला गर्दी जमू नये यासाठी प्रयत्न झाले," असे धक्कादायक आरोप आमदार सरोज अहिरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांवर केलेत.
तसेच "मी एकनाथ शिंदेंचीही फॅन आहे, एखादा कार्यकर्ता आला तर ते त्याला दुखावत नाहीत. मात्र ग्राऊंडची परिस्थिती बघून एखाद्या कार्यकर्त्याला खुश करण्याचा प्रयत्न करा. भुरटे आणि चोरटे लोकांपासून एकनाथ शिंदे साहेबांनी सावध राहावं असे म्हणत माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सरोज अहिरे म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
दरम्यान, सरोज अहिरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर अजित पवार यांनीही याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवारांसमोर शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांचाही शिंदे गटावर निशाणा साधला. महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, लोकांच्या कामाच्या आड येऊ नये.. आम्ही तुझ्या पाठीशी मजबुतीने उभे आहोत, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world