रात्रीच्या अंधारात डुलणारा 20 फुटी साप, 2 रुपयांचे चिंचोके ते ओस्नो जल; अशोक खरात भक्तांना कसं गंडवायचा?

बलात्काराचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात कशा पद्धतीने अघोरी कृत्य करून महिलांना आपल्याकडे आकर्षित करत पैसेही उकळायचा याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Ashok Kharat's Modus Operandi : बलात्काराचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात कशा पद्धतीने अघोरी कृत्य करून महिलांना आपल्याकडे आकर्षित करत पैसेही उकळायचा याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाच्या कथनाकालाही लाजवेल अशा पद्धतीने तो चमत्कार घडवून आणायचा. नक्की काय होता भोंदू अशोकबाबाचा फंडा बघुयात NDTV मराठीचा या स्पेशल रिपोर्ट.


२० फुटी सापाच्या माध्यमातून चमत्कार... 


एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाच्या कथनाकालाही लाजवेल अशा पद्धतीचा चमत्कार घडवून आणत अशोक खरात हा भक्तांना वेड्यात काढत त्यांच्याकडून पैसे उकळत होता. सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये बाबाचे हे ईशान्येवर महादेव मंदिर आहे आणि याच मंदिरात तो भक्तांना रात्रीच्या वेळी बोलवत अघोरी कृत्य करायचा. रिमोट कंट्रोलच्या आधारे नकली प्लास्टिकच्या 20 फुटांच्या सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा. पूजा सुरू झाली की तंत्र मंत्र करीत भल्या मोठ्या नागाला तो स्वतः कडे बोलवायचा. नागदेखील सरपटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून उभा राहायचा.. सापासोबतच वाघाची कातडीही समोर यायची आणि ही सर्व दृश्य बघून बघून उपस्थित भाविकांची बोलतीच बंद व्हायची. खरात सांगेल त्या पद्धतीने नाग हालचाली करायचा. त्यानंतर खरातच्या आदेशावरून साप निघून जायचा. हा सर्व प्रकार झाल्यानंतर खरात भाविकांना मी नागाला वशमध्ये केल्याची बतावणी करायचा. खरातचा हा चमत्कार बघून सगळे प्रभावित व्हायचे.

Advertisement

खरात भाविकांना कसं गंडवायचा?

अंधारलेली रात्र.... जंगलातले रातकिड्यांचे आवाज..... मंत्रांचे उच्चार....अशा अंधाऱ्या रात्री अशोक खरात त्याच्या भाविकांना जंगलात बोलवायचा. भाविक तिथे आले की खरात तंत्र-मंत्र करायचा आणि त्यानं इशारा केला की २० फुटांचा एक मोठ्ठा नाग सळसळ करत यायचा. फणा काढायचा.... खरात जसे इशारे करेल तसं हा नाग करायचा आणि खरातनं जाण्याचा इशारा केला की नाग निघून जायचा. खरातकडे आलेले भाविक हा प्रकार पाहून थक्क व्हायचे आणि खरातच्या चमत्कारांवर त्यांचा विश्वास बसायचा. हा नाग म्हणजे भाविकांना गंडवण्यासाठीची मोडस ऑपरेंडी होती. पोलिसांनी खरातला ताब्यात घेतलं आणि नागाला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवणारा खरात पोपटासारखं बोलू लागला. त्यातूनच उघड झालं या नागाबद्दलचं सत्य.

नक्की वाचा - State Women Commission : महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण होणार? रोहित पवारांनी सुचवलेली 4 नावं कोणती?

नाग नव्हे तर कागदाचा लगदा...

खरात वापरत असलेला हा नाग खोटा होता. त्यानं कागदाच्या लगद्यापासून हा नाग तयार केला होता. कागदाच्या लगद्याचा हा नाग हुबेहूब खऱ्या नागासारखा दिसायचा. या नागामध्ये ड्रोन यंत्रणा बसवली होती. त्या नागाचा रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असायचा. रिमोटच्या मदतीनं खरात त्या नागाला हवं तसं वळवायचा. नागाला बोलावून चमत्कार दाखवायचा हा प्रकार खरातच्या मिरगावमधल्या श्री शिवनिका संस्थानामध्ये रोज चालायचा. या बनावट नागाबरोबरच खरात वाघाचं कातडंही दाखवायचा. 

भोंदूबाबा हा व्हायग्रा गोळ्यामिश्रित पाणी पीडितांना द्यायचा. ज्याला तो ओस्नो जल आहे असे सांगायचा. हा भोंदूबाबा अशोक खरात ओश्नो तयार करायचा. श्रावणातले चार सोमवार आणि महाशिवरात्रीला हे ओश्नो प्राशन करायला लावायचा. ओम इशनेश्वरराय नमः हा जप करायला सांगायचा.

मंतरलेले चिंचोकेची एका लाखात विक्री

भाविकांना गंडा घालण्यासाठी अशोक खरात भाविकांना मंतरलेले खडे आणि रत्नही द्यायचा. मंतरलेले चिंचोकेही द्यायचा. बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खरात पॉलिश करून घ्यायचा. त्या चिंचोक्यांची महागात विक्री करायचा. मंतरलेले चिंचोके भाविकांना घरात ठेवायला सांगायचा. समोरच्या व्यक्तीची आर्थिक क्षमता बघून हे चिंचोके  10 हजार ते 1 लाखांपर्यंत विकायचा. माझ्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं सांगत नकली खडे आणि रत्नंही भाविकांना विकायचा. एकंदरीतच काय तर बाबाने शोषण केलेल्या पीडित महिला या जस जशा न घाबरता धीराने तक्रार देण्यासाठी पुढे येतायत तसं तसे बाबाचे प्रताप आणि विकृती समोर येत असून बाबाने आणखी किती जणांना आणि कशाप्रकारे गंडा घातलाय याकडे आणि SIT तपासाकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.. 

Advertisement

स्थानिकांनी फिरवली पाठ...

सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात ग्रामस्थ दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला पूजेसाठी जमायचे. मात्र नंतर खरातचे कारनामे कळल्यानंतर ग्रामस्थांनी खरातच्या पूजेला जाणं बंद केलं. हाच खरात सोमवती अमावास्येला अनामिका कापायला लावूम तंत्र-मंत्र करायला लावायचा. त्यासाठीच रुपाली चाकणकरांनीही अनामिका कापल्याचे आरोप सुषमा अंधारेंनी केले होते.