Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाचं नियुक्त करणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चार महिलांची नावं सुचवली आहेत. (Maharashtra State Commission for Women)
नाशिक येथील स्वयंघोषित 'भोंदूबाबा' अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या कथित व्हिडिओ आणि फोटोंमुळे रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारला सल्ला देत नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी चार नावांचा पर्याय समोर ठेवला आहे.
काय आहे प्रकरण?
अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. चाकणकर यांचे खरातसोबतचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये त्या खरात याचे पाय धुताना दिसत आहेत. यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले पद सोडले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम'च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2026
रोहित पवार यांनी सुचवली चार नावं...
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, महिला आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय पुनर्वसनाचे साधन न ठरता महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांकडे दिलं जावं.
- सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर
- सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे
- मासूम संस्थेच्या मनीषा गुप्ते
- सेवानिवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाळगीळ
रोहित पवार यांचं ट्विट...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम'च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world