Nashik News: प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर यांची आत्महत्या; नाशिकमध्ये खळबळ

मनिषा जेजुरकर यांनी त्यांच्या  गंगापूर रोडवरील घरात आयुष्य संपवले. त्यांनी  घरातील खिडकीला असलेल्या लोखंडी रॉडला  नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Dr. Manisha Jejurkar Death:  नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर  यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

नाशिकमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनिषा जेजुरकर यांनी त्यांच्या  गंगापूर रोडवरील घरात आयुष्य संपवले. त्यांनी  घरातील खिडकीला असलेल्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. 

Advertisement

SSC Exam Scam: CEO मॅडमच्या आयुष्यावर नाटक, वाहवा मिळवून घेतला चार्ज; पेपर स्कॅम प्रकरणाची INSIDE स्टोरी

त्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांचे भाऊ गौरव ज्ञानेश्वर भास्कर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयामध्ये डॉ. श्रावणे यांनी तपासले आणि मृत झाल्याचे घोषित केले. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी  सामान्य रुग्णालयातील पोलिस चौकीत डॉ. चौधरी यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर यांचे शरणपूर रोडला खासगी रुग्णालय होते. त्यांचे पती नाशिकमध्ये प्रसिद्ध डॉक्टर असून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम पाहत होते. स्वतः मनिषा जेजुरकर या आयुर्वेदिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे सर्वम आयुर्वेद बहु-विशेषज्ञता आणि पंचकर्म केंद्र नाशिक शहरात आहे. त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे. 

UPSC Exam 2025 : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची भरारी, 60 पेक्षा जास्त उमेदवार बनले अधिकारी,वाचा संपूर्ण यादी

Topics mentioned in this article